स्वप्नात जर दागिने दिसले तर त्याच्या अर्थ जाणून तुम्ही आश्चर्यात पडाल

तुम्हाला बर्‍याच प्रकारचे स्वप्न येत असतील. काही स्वप्नांबद्दल तुम्हाला छान वाटत असेल तर काही स्वप्न बघून तुम्हाला भिती देखील वाटत असेल. जेव्हा आम्हाला स्वप्न येतात तेव्हा आम्हाला बर्‍याच प्रकारचे माणसं आणि वस्तू दिसतात. तुम्हाला स्वप्नात ज्या गोष्टी दिसतात त्यांचा एक अर्थ असतो आणि त्याच्या सरळ संबंध तुमच्या वास्तविक जीवनाशी असतो. हे स्वप्न तुम्हाला येणार्‍या काळाबद्दल आणि घटनांबद्दल सांगतात पण आम्ही याला समजू शकत नाही.
 
आज आम्ही तुम्हाला सांगू की जर स्वप्नात दागिने दिसले तर याचा अर्थ काय असतो. जर स्वप्नात सोनं चांदी आणि दागिने दिसले तर याचे बरेच अर्थ निघतात आणि ते त्याबद्दल सांगतात जे पुढे होणार आहे.  
 
स्वप्नांमध्ये दागिने दिसणे   
जर तुम्ही स्वप्नात दागिने बघितले तर याचा अर्थ असा असतो की तुमच्या येणार्‍या काळात फार मोठा खर्च होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा ही असू शकतो की तुमच्या कुटुंबात एखाद्याचे लग्न जुळून येतील किंवा मोठा उत्सव देखील होऊ शकतो. म्हणून घाबरण्यासारखेच काही नाही. फक्त तुमचा खर्चच वाढणार आहे अजून काही नाही. 

दागिने गिफ्ट करणे  
जर तुम्ही स्वप्नात बघितले की तुम्ही एखाद्याला सोनं किंवा ज्वेलरी गिफ्ट करत आहे तर तुम्हाला घाबरण्यासारखे काहीच नाही कारण लवकरच तुम्हाला व्यापारात नफा होण्याची शक्यता आहे आणि तुमचे प्रमोशन देखील होऊ शकत. म्हणून हे बघणे शुभ मानले जाते.  
 
दागिन्यांना घातलेले बघणे   
जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला दागिने घातलेले बघितले तर हे अशुभ संकेत आहे.  तुमच्या जवळचा एखादा व्यक्ती तुमच्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे किंवा तुमचे लग्न मोडण्याची देखील शक्यता असते. असे स्वप्न बघितले तर तुमची नोकरी जाण्याचे देखील संकेत आहे. हे बघणे अशुभ असत.   
लग्न झालेली स्त्री    
असे मानले जाते की वस्तूनुसार स्वप्नात बघितलेल्या प्रत्येक गोष्टीचे आपले अर्थ असतात. जर स्वप्नात तुम्ही असे बघितले की लग्न झालेल्या स्त्रीला दागिना देत आहात किंवा सौभाग्यवती स्त्री तुमच्या स्वप्नात आली असेल. किंवा तुम्ही बघितले की कोणाचे लग्न होत आहे आणि तुम्ही ते बघत आहात. असे तेव्हा होते जेव्हा तुमच्या येथे कोणाचे लग्न होणार असेल.  
 
दागिन्याची खरेदी करणे 
जर तुम्ही स्वप्नात असे बघितले की तुम्ही सोनं विकत घेत आहात तर याचा अर्थ असा आहे की तुमचे भाग्य आता उजळणार आहे. असे तेव्हा होते जेव्हा तुम्ही फार लवकर यशस्वी होणार असाल.  
दागिन्याची चोरी होणे  
जर तुम्ही स्वप्नात बघितले की तुमचे दागिने गर्दीतून कोणी चोरी करून घेऊन गेले तर याचा अर्थ असा की तुम्हाला अचानक एखाद्या विरोधकाकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणून अशा वेळेस तुम्हाला सावध राहण्याची गरज असते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती