पुनर्जन्माचे 8 महत्त्वपूर्ण तथ्य

हिंदूसह अनेक धर्म असे आहेत जे हे तथ्य स्वीकार करतात की मनुष्याच्या मृत्यूनंतर दुसरा जन्म होतो. यामागे अनेक आश्चर्यजनक तथ्य आहे. हिंदू धर्माप्रमाणे आत्मा अमर आहे ती केवळ कपड्यांप्रमाणे शरीर बदलते. भविष्यात आपल्याला कोणत्या शरीरात जन्म मिळेल हे केवळ आपल्या चांगल्या आणि वाईट कृत्यांवर अवलंबून असतं. जाणून घ्या याबद्दल आणखी काही रोमांचक तथ्य:  
* बहुतांश मनुष्य, मनुष्य रूपातच जन्म घेतो. परंतू अनेकदा मनुष्य ते प्राणी रूपातही जन्म होतो. हे केवळ आपण मागील जन्मी केलेल्या कर्मांवर अवलंबून असतं.
 
* एखाद्या व्यक्तीची इच्छा पूर्ण न झाल्यास ती व्यक्ती भूत बनते. त्या व्यक्तीची आत्मा संसारात भटकतं असते, ती तो पर्यंत नवीन शरीरा धारण करायला तयार नसते जोपर्यंत तिची अर्धवट इच्छा पूर्ण होत नाही.
 
* हिंदूप्रमाणे हे शरीर नश्वर आहे जे मरणोपरांत नष्ट होऊन जातं. म्हणूनच मृत्यू क्रिया अंतर्गत डोक्यावर मार देऊन ते तोडण्यात येतं ज्याने व्यक्तीला या जन्मातील सर्व गोष्टींचा विसर पडावा. 
 
* ग्रंथांप्रमाणे आत्मा खूप उंच आकाशात निघून जाते, जी मनुष्याच्या पोहोच बाहेर आहे आणि आत्मा नवीन शरीरातच प्रवेश करते.

* मनुष्य सात वेळा स्त्री किंवा पुरूष बनून हे शरीर धारण करतं. शरीर धारण केल्यावर त्यांना आपल्या कर्मांद्वारे आपलं भाग्य लिहिण्याची संधी मिळते.
 
* आत्मा मृत्यूनंतर लगेच नवीन जन्म घेत नाही. काही महिने किंवा वर्ष सरल्यावर अनुकूल स्थिती असल्यावर आत्मा नवीन शरीरात प्रवेश करते.
* काही ऋषी मुनींचे म्हणणे आहे की जन्मावेळी आमच्या मेंदूत पूर्वजन्माच्या सर्व गोष्टी असतात. पण याचा विसर पडतो आणि थोडं मोठं झाल्यावर आम्हाला काहीच आठवतं नाही. पूर्वजन्माच्या गोष्टी आठवणे काही विशिष्ट अथवा महान जीवात्मांसाठी शक्य आहे, सर्वांसाठी नाही.
 
* हिंदूप्रमाणे मनुष्याच्या कपाळावर तिसरा डोळा असतो. जेव्हा आत्मा, परमात्म्याला भेटते तेव्हा हा डोळा उघडतो आणि ब्रह्म बनतो. तिसरा डोळा उघडल्यावर भगवत प्राप्ती होते तोपर्यंत मनुष्य संसारात आणि विषय-वासनेत गुंतलेला असतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती