Radha Ashtami 2019: या कुंडात केस मोकळे करून स्नान केल्याने होते संतानं प्राप्ती

गुरूवार, 5 सप्टेंबर 2019 (13:35 IST)
प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला श्रीराधा अष्टमी पर्व म्हणतात. या वर्षी हा सण 6 सप्टेंबर 2019 रोजी साजरा करण्यात येईल. हिंदू धर्मानुसार अष्टमीच्या दिवशी कृष्णाची बाल सखा राधाचा जन्म झाला होता. राधा बगैर कृष्णाचे व्यक्तित्व अपूरे आहे. या दिवशी उपास ठेवल्याने व्यक्ती आपल्या समस्त पापांपासून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करतो. जर तुम्ही देखील हा उपास ठेवून राधा-कृष्णाची कृपा मिळवण्यास इच्छुक असाल किंवा संतानचे इच्छुक असाल तर या शुभ मुहूर्तावर राधा अष्टमी व्रताची पूजा केली पाहिजे.  
 
राधा अष्टमी व्रताच्या पूजेचा शुभ मुहूर्त-
-राधा अष्टमी 2019 तिथी - 6 सप्टेंबर 2019 -राधा अष्टमी 2019 शुभ मुहूर्त- अष्टमी तिथी 5 सप्टेंबर 2019 मध्ये रात्री 8 वाजून 49 मिनिटाने आरंभ होऊन 6 सप्टेंबर 2019 ला रात्री 8 वाजून 43 मिनिटावर समाप्त होत आहे.   
 
राधा अष्टमी उद्यापन विधी-
1. राधा व्रताच्या उद्यापनात एक सूप घेतले जाते.    
2. या सूप मध्ये शृंगाराच्या सर्व वस्तू ठेवल्या जातात.   
3. त्यानंतर या सूपड्याला झाकून ठेवतात आणि 16 दिवे लावतात.   
4. नंतर चंद्राला अर्ध्य दिला जातो आणि लक्ष्मीला घरी यायचे निमंत्रण दिले जाते.   
5. शेवटी शृंगाराच्या सर्व वस्तूंचे दान केले जातात.  
 
नि:संतानं दंपतीसाठी वरदान आहे मथुराचा राधा कुंड- 
धार्मिक विद्वानांनुसार वृंदावनच्या राधा कुंडाला अत्यधिक पवित्र मानले जाते. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार जो मनुष्य या राधा कुंडात एकदा स्नान करतो त्याचे समस्त पाप दूर होऊन जातात. एवढंच नव्हे तर जर कोणी नि:संतानं दंपती या राधा कुंडात स्नान करतात त्यांना लवकरच संतानं सुखाची प्राप्ती होते. या कुंडाबद्दल एक अूजन प्रथा आहे की संतानहीन महिलांनी जर केस मोकळे ठेवून राधा कुंडात स्नान करत राधाजवळ स्वत:साठी संतानं सुखाची प्रार्थना केली तर त्यांची इच्छा फार लवकर पूर्ण होते. या कुंडाला श्याम कुंडच्या नावाने देखील ओळखण्यात येते. जे गोवर्धनाहून 5 किलोमीटर दूर स्थित आहे.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती