पूजेचं साहित्य प्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतं, विश्वास बसत नसेल तर वाचा

शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (13:36 IST)
सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघून संसर्गापासून वाचण्यासाठी सामाजिक अंतर राखणं, मास्क वापरणं, सेनेटाईझर वापरणं सारख्या सूचना मिळतच आहे त्याच बरोबर आपली रोग प्रतिकारक शक्ती ज्याला आपण इम्यून सिस्टम म्हणतो ते वाढविण्याचे सल्ले मिळत आहे. हे खाल्ल्यानं इम्यून सिस्टम वाढतं ते खाल्ल्यानं इम्यून सिस्टम वाढतं, आपण हे गेल्या सहा महिन्यापासून ऐकत आहोत. पण आपणांस ठाऊक आहे की आपण आपल्या पूजेमध्ये जे काही साहित्ये वापरतो त्यामुळे देखील आपली प्रतिकारक शक्ती वाढते. 
 
होय, आपल्या पूजेच्या साहित्यापासून कसं काय शक्य आहे जे जाणून घ्या-
आपल्या भारताच्या संस्कृतीमध्ये आपल्या परंपरा, रीती-भाती, विचार सरणी, होमहवन, जप-तप, ध्यान- आराधना, नाम स्मरण, उपासने साठी आणि दररोजच्या पूजे साठी लागणारे पूजेचे साहित्य साधे सुधे वापरतात. पण व्रत -वैकल्ये, सणासुदी, उत्सवाला लागणारे पूजेचे साहित्य विशेष असतं. 
 
होम हवनात देखील लागणारे साहित्य विशेष असतात. आणि या साहित्यांमुळे आपली प्रतिकारक शक्ती वाढते असं संशोधकांनी सांगितलं आहे. चला तर मग जाणून घ्या काय आहे ते साहित्य -
 
1 लवंग - 
लवंग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास उपयुक्त मानली जाते. लवंग ही होम हवनासाठी विशेष मानली जाते. मान्यतेनुसार लवंगांशिवाय होम हवन अपूर्ण मानले जाते. लवंग ही पवित्र मानले जाते. आपल्या घरात कलह होतं असल्यास कापूर, आंब्याच्या समिधा आणि 11 शाबूत असलेल्या लवंगा घेऊन तूप टाकून त्याचा धूप द्यावा. या धुपाला सकाळ संध्याकाळ दररोज घरात दाखवल्यानं घरातील कलह दूर होतात. आणि आपल्या शरीरावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो.
 
2 कापूर - 
दररोज घरात कापूर लावल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. कापराचा धूर दिल्यानं मन आणि मेंदू शांत राहतं. पूजा आणि होम हवन मध्ये कापूर आवर्जून वापरतात. कापराच्या नियमित वापर केल्यानं प्रतिकारक शक्ती वाढते. यांचे वैज्ञानिक महत्त्व देखील सांगितलं आहे. पितृदोष असल्यास दिवसाच्या तिन्ही प्रहरी कापूर मिश्रित धूप घरात फिरवल्यानं पितृदोष दूर होतं. त्या शिवाय वैवाहिक जीवनात काही अडचण असल्यास रात्री झोपण्याच्या पूर्वी एका पितळेच्या भांड्यात गायीच्या तुपात कापूर मिसळून धूप दाखवावा. असं केल्यास वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. 
 
3 वेलची - 
वेलची शुक्र ग्रहाशी निगडित असते. वेलची प्रतिकारक शक्ती वाढवते. मनाजोगती नोकरी मिळविण्यासाठी वेलचीचे उपाय केल्यानं फायदा होतो. त्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली पिंपळ्याच्या पानावर दोन वेलच्या आणि पाच प्रकारच्या मिठाई ठेवाव्या आणि ठेवून परत येताना मागे वळून बघू नये. असं सलग तीन गुरुवारी करावं.
 
4 मध - 
आपल्या सर्व पूजे साठी होम -हवन, सणासुदीला, व्रत वैकल्य पंचामृत लागत असतो. या पंचामृतात मध वापरतात. आरोग्याच्या दृष्टीने मद्याचे नियमानं सेवन केल्यानं प्रतिकारक शक्ती वाढते. तसेच बरेच आजार दूर होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीत मंगळाचे दोष असल्यास याचा सेवन करू नये. मंगळाचा प्रभाव कमी करण्यासाठी दर मंगळवारी शंकराला मध अर्पण करावं. तसेच गुरुची वक्रीय दृष्टी असल्यास मद्याला सोन्या किंवा पितळ्याच्या भांड्यात ठेवावं. वैवाहिक जीवनात प्रेम वाढण्यासाठी आपल्या शयनकक्ष मध्ये एका काचेच्या बाटलीत मध भरून ठेवावं. 
 
5 तूप - 
पंचामृतात मध प्रमाणे तुपाचा ही वापर केला जातो. गायीचे तूप उपयुक्त आणि गुणकारी असतं. आरोग्याच्या दृष्टीने देखील गायीच्या तुपाचे खूप महत्त्व आहे. आपल्या प्रतिकारक शक्तीला वाढविण्यासाठी दररोज तुपाचं सेवन करावं. घरात समृद्धी आणि भरभराट येण्यासाठी दररोज संध्याकाळी गायीच्या तुपाचा दिवा लावावा. या मध्ये केशराचा वापर केल्यास उत्तमच आहे. घरात सकारात्मकता येते. नैराश्य आणि नकारात्मकतेचा नायनाट होतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती