पहिली पोळी वेगळी काढून ठेवावी

दररोज आहारात आवश्यक रूपात सामील पोळीचे काही उपाय देखील आहेत ज्याने भाग्य बदलू शकतं तर जाणून घ्या पोळीचे काही सोपे उपाय
 
1. आपल्या घरातील स्वयंपाकघरात पहिली पोळी शेकल्यानंतर त्यावर साजुक तूप लावून त्याचे चार तुकडे करावे. चारी तुकड्यांवर खीर, गूळ किंवा साखर ठेवावी. यातून एक भाग गाय, दुसरा भाग कुत्र्याला, तिसरा भाग कावळ्याला तर चौथा भाग भिकार्‍याला द्यावा. गायीला पोळी दिल्याने पितृदोष दूर होतं, कुत्र्याला पोळी दिल्याने शत्रू भय दूर होतं, कावळ्याला पोळी दिल्याने पितृदोष तर गरिबाला पोळी दिल्याने आर्थिक कष्ट दूर होतात आणि कामात येत असलेल्या अडचणी देखील दूर होतात.
 
2. जर आपल्या जीवनात शनीची पीडा असेल किंवा राहू-केतूची अडचण असेल तर पोळीचा हा उपाय आपल्यासाठी अचूक सिद्ध होऊ शकेल. या सर्व ग्रहांची अशुभता दूर करण्यासाठी रात्री बनवलेल्या शेवटल्या पोळीवर मोहरीचे तेल लावून काळ्या रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालावी. काळा कुत्रा नसल्यास कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालावी.
 
3. आमच्याकडे अतिथी देवाचे रूप असल्याचे मानले गेले आहे मग व्यक्ती श्रीमंत असो वा सामान्य. अशात एखादा निर्धन किंवा गरीब आपल्या दारासमोर आल्यास यथाशक्ती भोजन करवावे. भोजनात पोळी सामील असावी. भोजन स्वत:च्या हाताने वाढावे.
 
4. जर खूप प्रयत्न करून देखील यश हाती येत नसेल तर हा पोळीचा उपाय आपल्यासाठी वरदान सिद्ध होईल. पोळी आणि साखर मिसळून त्याचे चुरा करून मुंग्यांना खाऊ घालाव्या. याने सर्व अडचणी दूर होतात.
 
5. आपल्या घराच्या शांतीला नजर लागली असल्यास आणि घरात विनाकारण कटकटी होत असल्यास पोळीचा हा उपाय अमलात आणून बघा. दुपारी आपल्या स्वयंपाकघरात पोळ्या शेका. पहिली पोळी गायीसाठी आणि शेवटली कुत्र्यासाठी काढून ठेवा. आणि स्वत: भोजन करण्यापूर्वी पोळी गाय आणि कुत्र्याला खाऊ घाला. असे करणे शक्य नसल्यास नंतर देखील खाऊ घालू शकता.
 
6. आपल्या करिअरमध्ये अडथळे निर्माण होत असल्यास किंवा नोकरी मिळत नसल्यास हा उपाय आपल्यासाठी आहे. पोळीच्या डब्यातील खालून तिसरी पोळी घ्यावी, तेलाच्या वाटीत आपल्या मध्यमा आणि तर्जनी बोट सोबत बुडवून त्या पोळीवर दोन्ही बोटांनी एक रेषा ओरखडावी. आता काही न बोलता ही पोळी दोन रंगाच्या कुत्र्याला खाऊ घाला. हा उपाय गुरुवार किंवा रविवार केल्यास करिअरसंबंधी प्रत्येक अडचण दूर होण्यास मदत मिळेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती