गांधारीला आपल्या पुत्र दुर्योधनाला नग्न का बघावयाचे होते?

गुरूवार, 21 मे 2020 (07:49 IST)
गांधारी ही शंकराची भक्त असे. शंकराची तपश्चर्या करून तिने त्यांच्याकडून हे वर मागितले होते की ती ज्याला कोणालाही आपल्या डोळ्यावरील बांधलेली पट्टी काढून त्याला नग्न बघेल त्याचे शरीर वज्राचे होईल. 
 
भीमाशी युद्ध करण्यापूर्वी गांधारीने डोळ्यावरील पट्टी काढून दुर्योधनाचं शरीर वज्र करण्याचे इच्छिले होते, पण श्रीकृष्णाचं म्हणणं ऐकून दुर्योधनाने आपले गुप्तांग पानाच्या साहाय्याने लपवून घेतले होते. जेणे करून त्याचे गुप्तांग आणि मांडी दुर्बळ राहिले. बाकीचे सर्वांग वज्रासारखे झाला. 
 
घटना अशी आहे की गांधारी दुर्योधनाला म्हणते की मी तुला जिंकण्याचे आशीर्वाद तर नाही पण शिव भक्तीने तुला एक कवच देऊ शकते. तू गंगेमध्ये अंघोळ करून सरळ माझ्याकडे ये, पण जसा तू जन्माला आला तसंच तुला माझ्याकडे यायचं आहे. तेव्हा दुर्योधन आई ला विचारतो नग्नच का आई ? तेव्हा गांधारी त्याला म्हणते आईच्या समोर कसली लाज बाळ ? जा आणि अंघोळ करून नग्न ये. जशी आपली आज्ञा आई, असे म्हणत तो निघून जातो. 
 
दुर्योधन तेथून गेल्यावर श्रीकृष्ण गांधारी कडे येतात. गांधारी त्यांना म्हणते की, या देवकीनंदन आपल्याला आठवत असेल तर 17 दिवसांपूर्वी मी 100 मुलांची आई असे. पण आता फक्त 1 मुलाची आई आहे. श्रीकृष्ण होकार देतात. आणि हात जोडून गांधारीला म्हणतात की या सर्व मृत शरीरांमध्ये एक मृत शरीर असे ही आहे ज्याला आपणं ओळखून सुद्धा ओळखत नाही, आणि ते आहे थोरल्या कौंतेयांचे. 
 
यावर गांधारी युधिष्ठिराचे नाव घेते तेव्हा श्रीकृष्ण सांगतात, नाही माते, राधेय आहे थोरले कौंतेय. हे ऐकून गांधारी स्तब्ध होते. श्रीकृष्ण त्यांना म्हणतात की आपण असे समजू नये की या युद्धात आपल्या मुलाच्या पक्षात माझ्या आत्याच्या मुलांपैकी कोणीही लढले नाही. 
 
हे रहस्य सांगितल्यावर श्रीकृष्ण गांधारीचा निरोप घेऊन बाहेर पडतात. तेव्हा त्यांना वाटेत दुर्योधन नग्न अवस्थेत आपल्या आईजवळ जाताना दिसतो. 
 
श्रीकृष्ण त्याला बघून हसतात, आणि म्हणतात की युवराज दुर्योधन आपण अश्या अवस्थेमध्ये ? आपले कपडे आपण कुठे विसरून आला आहात का ? आणि आपण तर माता गांधारीच्या दिशेने जाताना दिसत आहात. हे ऐकून दुर्योधन चकित होतो.
 
तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणतात की आपण अश्या स्थितीत आपल्या आईकडे जात आहात का? त्यावर दुर्योधन उत्तरतो की होय आईनेच असे करण्याची आज्ञा दिली आहे. 
 
तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणतात की पण ती आपली आई आहे. त्यांनी बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या मांडीत घेतले आहे पण आपण तर त्यांचे वयात आलेले पुत्र आहात, आणि कोणत्याही वयात आलेल्या मुलाने आपल्या आई समोर नग्नावस्थेत जाणे योग्य नाही. ही तर आपली परंपरा नाही. वरून कृष्ण हसून म्हणतात की तसे पण आपणं भरतवंशाच्या परंपरेचे पालन करता तरी कुठे. ते तर आपण कधीचेच सोडले आहेत. जा जा आईला ताटकळत बसवू नये. हसून श्रीकृष्ण तेथून निघून जातात.
 
मग दुर्योधन विचारात पडतो आणि आपल्या गुप्तांगावर केळीचे पान लावून आपल्या आईच्या समोर येतो आणि म्हणतो की मी अंघोळ करून आलो आहोत. गांधारी त्याला म्हणते की मी आज आपल्या डोळ्यावरची ही पट्टी काढणार आहे. मी आजतायगत तुझ्या भावांना तर बघितले नाही पण मी आज तुला बघणार आहे. 
 
असे म्हणून गांधारी आपल्या डोळ्यावरची पट्टी काढून दुर्योधनाला बघते. तिच्या डोळ्यातून तेजपुंज निघून दुर्योधनाच्या अंगावर पडतात. नंतर गांधारी बघते तर दुर्योधनाने आपले अंग केळीच्या पानाने लपविले आहे. तेव्हा ती त्याला म्हणते की हे तू काय केलंस? 
 
त्यावर दुर्योधन उत्तरतो की मी आपल्यासमोर नग्नावस्थेत कसा काय आलो असतो. गांधारी म्हणते की पण मी तर तुला असे यायलाच सांगितले होते. 
 
दुखी मनाने ती आपल्या डोळ्यावर परत पट्टी बांधून घेते. आणि सांगते की तुझ्या अंगाचा तो भाग जो मी बघितलाच नाही दुर्बळ राहिला आणि बाकीचे अंग वज्राचे झाले. तू मोठ्यांची आज्ञा पालनाची परंपरेला विसरला नसता तर आज तू अजिंक्य झाला असता.
 
हे ऐकून दुर्योधन म्हणतो की मग मी हे पान काढून टाकतो. त्यावर गांधारी म्हणते की मी कोणी मायावी नाही. माझ्या सर्व भक्तीची शक्ती, माझे सतीत्व, प्रेम आणि वात्सल्य त्या एका दृष्टिक्षेपात मिसळले होते. 
 
तेव्हा दुर्योधन म्हणतो की आपण काळजी नका करू मी उद्या भीमाशी गदायुद्ध करीन आणि गदा युद्धाच्या नियमानुसार कंबरेच्या खाली मारणे निषिद्ध आहे. उद्या मी त्याला इतके मारेन की तो घाबरून स्वतःच मरून पडेल. मग युद्धाचा अंत काही ही होवो. नंतर भीम दुर्योधनाच्या मांडी वर वार करतो आणि त्यांची मांडी तोडून त्याला ठार मारतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती