आज पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल मंगळ ग्रह, लोक घरूनच बघू शकतात

शुक्रवार, 27 जुलै 2018 (12:25 IST)
27 जुलै रोजी मंगळ ग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळ राहणार आहे. यामुळे हा ग्रह सर्वात जास्त चमकदार आणि सूर्ख लाल दिसणार आहे. ही एक अशी दुर्लभ खगोलीय घटना आहे ज्यात मंगळ ग्रह पृथ्वी व सूर्याच्या एका सरळ रेषेत राहणार आहे. याचा अर्थ असा आहे की तिन्ही ग्रह 180 डिग्री कोणावर राहतील. या घटनेला खगोलशास्त्राच्या भाषेत मंगळ ग्रहाचा अपोजिशन म्हणतात. मंगळ ग्रहाच्या अपोजिशनची घटना प्रत्येक दोन वर्ष (26 महिन्यात) होते. पुढील मंगळ ग्रहाचा अपोजिशन वर्ष 2020 मध्ये 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे.  
 
मंगळ ग्रहाचा अपोजिशन वर्ष 2018 चे एक अत्यंत दुर्लभ व लोकांना आकर्षित करणारी घटना आहे. 27 ची संध्याकाळी जसे पश्चिम दिशेत सूर्य अस्त होणे सुरू होईल. या दरम्यान पूर्व दिशेकडून मंगळ ग्रहाचा उदय होणे सुरू होईल. मंगळ ग्रहाचे पृथ्वीच्या सर्वात जवळून जाण्याचे कारण स्पष्ट दिसून येत आहे. पूर्ण रात्र लोकांना हा ग्रह दिसू शकतो. लोक आपल्या घरातून बगैर दुर्बीणच्या मदतीने देखील बघू शकतात. पूर्व दिशेत सुर्ख चमकदार तारा दिसेल. तोच मंगळ ग्रह राहील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती