मंगळवार व्रत कथा Mangalvar Vrat Katha

मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023 (09:15 IST)
एकेकाळी एका ब्राह्मण जोडप्याला मूलबाळ नव्हते, त्यामुळे ते खूप दुःखी होते. एकदा एक ब्राह्मण हनुमानाची पूजा करण्यासाठी जंगलात गेला. तेथे त्यांनी पुत्रप्राप्तीची कामना केली.
 
घरी त्यांची पत्नीही पुत्रप्राप्तीसाठी मंगळवारी उपवास करत असे. मंगळवारी उपवास संपल्यावर हनुमानजींना भोग अर्पण केल्यावरच ती जेवत असे.
 
एकदा उपवासाच्या दिवशी ब्राह्मणाची पत्नी हनुमानजींसाठी भोग तयार करु शकली नाही. तेव्हा तिने प्रण केला की हनुमानजींना भोग अर्पण केल्यावरच ती पुढच्या मंगळवारी भोजन करेल.
 
ती सहा दिवस उपाशी व तहानलेली होती. मंगळवारी ती बेशुद्ध झाली. तिची भक्ती आणि समर्पण पाहून हनुमानजी प्रसन्न झाले. त्यांनी ब्राह्मणीला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला आणि सांगितले की तो तुझी खूप सेवा करेल.
 
मुल मिळाल्यावर ब्राह्मण पत्नी खूप आनंदित झाली. तिने मुलाचे नाव मंगळ असे ठेवले. काही वेळाने ब्राह्मण घरी आला तेव्हा मुलाला पाहून त्याने विचारले कोण आहे?
 
पत्नीने सांगितले की, मंगळवारच्या व्रताने प्रसन्न झालेल्या हनुमानजींनी तिला हे मूल दिले. बायकोच्या बोलण्यावर ब्राह्मणाचा विश्वास बसेना. एके दिवशी संधी पाहून ब्राह्मणाने त्या मुलाला विहिरीत टाकले.
 
घरी परतल्यावर ब्राह्मण पत्नीने विचारले, मंगळ कुठे आहे? तेवढ्यात मागून मंगळ हसत हसत आला. त्याला परत पाहून ब्राह्मणाला आश्चर्य वाटले. रात्री हनुमानजींनी त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले की त्यांनीच हा पुत्र दिला आहे.
 
सत्य जाणून ब्राह्मणाला खूप आनंद झाला. यानंतर ब्राह्मण जोडप्याने दर मंगळवारी उपवास सुरू केला.
 
जो व्यक्ती मंगळवार व्रताची कथा वाचतो किंवा ऐकतो, आणि नियमानुसार व्रत करतो, तो हनुमानजींच्या कृपेने सर्व संकटांपासून मुक्त होतो आणि सर्व सुख प्राप्त करतो, आणि हनुमानजींच्या कृपेला पात्र होतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती