Magh Purnima पवित्र नदीत स्नान करण्याचे महत्व, पद्म पुराणात सांगितलेली गोष्ट

शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (15:23 IST)
माघ पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्या संदर्भात माहिती पद्म पुराणातील एक कथेत सापडते. एकदा चुकीने प्रभू विष्णुंच्या पायाखाली एक विंचू आला. जसंच प्रभूंचा पाय त्या विंचवावर पडला त्यांने स्वत:च्या बचावासाठी श्रीहरीच्या पायाला दंश केले परंतू विंचूचा मृत्यू झाला. आपल्या पायाखाली आल्यामुळे जीव हत्या झाल्याचे दुख आणि त्या दंशामुळे होत असलेल्या अहसहनीय वेदनेमुळे विष्णुंचे मन विचलित झाले. त्यांना प्रश्न पडला की काय करावे. विंचूच्या दंशामुळे पसलेलं विष औषधांमुळे दूर झालं परंतू श्रीहरींना त्याच्या मृत्यूचा दुख सतावत होतं. ते स्वत:ला जीव हत्येचं दोषी समजतं होते. तेव्हा नारद तेथे आले आणि सर्व जाणून त्यांनी श्रीहरींना म्हटले की आपण पृथ्वीवर जाऊन पवित्र गंगेत माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान करावे, याने आपल्या मनातील सर्व वेदना दूर होतील आणि जीव हत्येचा पाप देखील नाहीसा होईल. नारदाचे ऐकून श्रीहरी वेष बदलून माघ पौर्णिमेला संगम तटावर स्नान करण्यासाठी पोहचले. तेथे त्यांनी स्नान केले आणि तटावर तपस्या करत असलेल्या ऋषी मुनींना दान-दक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन दोष मुक्त झाले. नंतर या कथेचा प्रचार नारदजींच्या मुखातून झाला आणि गंगा इत्यादी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा सुरू झाली.
 
गंगा स्नान महत्व
माघ पौर्णिमेला स्वयं विष्णू कोणत्याही रुपात स्नान करण्यास येथे येतात असे मानले जाते. म्हणून या दिवशी गंगा नदीत स्नान करण्याचे महत्त्व आहे. या दिवशी हरिद्वार, प्रयागराज आणि इतर ठिकाणी मेळे आयोजित केले जातात. या व्यतिरिक्त नर्मदा, यमुना, शिप्रा, गोदारी सह अनेक पवित्र नद्यांच्या काठी लाखो भाविका स्नान करतात. सोबतच दान-पुण्य देखील केलं जातं.
 
जवळपास नद्या नसल्यास काय करावे 
माघ पौर्णिमेला परंपरेनुसार पवित्र नदीत स्नान करावे परंतू जवळपास ही सुविधा नसल्यास किंवा जाणे शक्य नसल्यास आपण आपल्या घरीच अंघोळीच्या पाण्यात पवित्र नदीचे पाणी मिसळू शकता. अंघोळीच्या पाण्यात पवित्र सप्त नद्यांच्या पाण्याचे आवाहन करुन त्यात गंगा जल मिसळून स्नान करु शकता.
 
आवाहन मंत्र :
गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती ।
नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मिन संनिधिं कुरु ।।
 
स्नान केल्यानंतर आपल्या सामर्थ्यानुसार गरीब, निशक्त, गरजू व्यक्तींना अन्न दान, वस्त्र दान, फळ दान करावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती