प्रबोधिनी एकादशीला भगवान विष्णूंना कसे प्रसन्न करावे

गुरूवार, 23 नोव्हेंबर 2023 (13:10 IST)
Prabodhini Ekadashi 2023 प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रातून जागे होतात. पौराणिक मान्यतेनुसार देवउठनी एकादशीला भगवान विष्णू जागृत होताच शुभ आणि मांगलिक कार्य सुरू होतात. याशिवाय कार्तिक महिन्यातील एकादशी ही श्री हरीची कृपा प्राप्त करण्यासाठी विशेष मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूची नियमित पूजा करून विशेष उपाय केल्याने जीवनात शुभ प्राप्ती होते. यासोबतच भगवान श्री हरींचा विशेष आशीर्वादही प्राप्त होतो. पंचांगानुसार या वर्षी प्रबोधिनी एकादशीचा विशेष संयोग गुरुवार, 23 नोव्हेंबर रोजी येत आहे. एकादशीला कोणकोणते कार्य करून भगवान विष्णू प्रसन्न होतात ते जाणून घेऊया.
 
देवउठनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्मातून मुक्त होऊन विष्णुंच्या मूर्तीजवळ तुपाचा दिवा लावावा. नंतर त्यांचे आवाहन करत विधीपूर्वक पूजा आणि आरती करावी. प्रबोधिनी एकादशीला गुरुवार येत असल्याने ज्योतिष शास्त्रात याला धनाचे कारक मानले आहे. या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न केल्याने जीवनातील पैशाची कमतरता दूर होते असे म्हणतात.
 
पिवळे वस्त्र धारण करा
ज्योतिषीय मान्यतेनुसार प्रभू विष्णूंना पिवळा रंग अती प्रिय आहे. याच कारणामुळे त्यांच्या पूजेत पिवळ्या रंगाच्या वस्तू वापरल्या जातात. अशात प्रबोधिनी एकादशीला पिवळ्या रंगाचे वस्त्र घाऊन देवाची पूजा करावी आणि कपाळावर पिवळं तिलक करावं. असे केल्याने प्रभू विष्णू प्रसन्न होतात.
 
केळीच्या झाडाची पूजा
धार्मिक मान्यतेनुसार केळीच्या झाडात भगवान विष्णूंचा वास असतो. अशात महिला गुरुवारी व्रत करुन झाडाची पूजा करतात. देवउठनी एकादशीला गुरुवारचा संयोग येत असल्याने या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णु प्रसन्न होतील.
 
पिवळ्या वस्तूंचे दान
या दिवशी गुरुवार येत असल्याने देवाची पूजा केल्यानंतर पिवळ्या वस्तूंचे दान करणे शुभ ठरेल.
 
जनावरांना भोजन
या दिवशी जनावरांना खाऊ घालणे शुभ ठरेल. भगवान विष्णूंची पूजा केल्यानंतर प्रभू प्रसन्न होतात. परिणामस्वरूप लक्ष्मी देवीचा घरात वास राहतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती