मारुतीची मूर्ती दिवसातून चक्क 3 वेळा रूप बदलते

शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (10:09 IST)
-कुंवर राजेन्द्रपालसिंह सेंगर (कुसमरा)
 
मध्यप्रदेशातील देवास जिल्ह्यात बागली नावाचे स्थळ आहे तिथल्या मुख्य बाजारपेठेत असलेले श्री छत्रपती हनुमान मंदिर परिसरात श्रद्धा आणि भक्तीचे एक जुने केंद्र आहे. या देऊळात प्रतिष्ठित असलेली भगवान हनुमानाची त्वचेच्या रंगाची दगडाने बनलेली माणसाच्या आकाराची दुर्मिळ मूर्ती रामायण काळातील चार घटनांचा वर्णन करते. हनुमानजींचा चेहरा मोहक आणि तेजस्वी आहे. यामुळे देवत्व आणि शांतता दिसून येते. 
 
आख्यायिकेनुसार हनुमानाने स्वतःच या जागेची निवड केली होती. रियासत काळात बैलगाडी ज्या ठिकाणी ठेवलेली होती त्या जागेवरून अजिबात एक इंच देखील हालली नाही आणि कालांतराने त्याचा ठिकाणी देऊळाची निर्मिती झाली. या देऊळाचे अनेक वैशिष्ट्ये आहेत. 
 
मूर्ती विशेष का? 
देऊळाचे पुजारी पंडित दीपक शर्मा सांगतात की देवाची मानवाकार मूर्ती तब्बल 9 फूट उंच आणि साडेतीन फूट रुंद आहे. आणि त्यांचा खांद्यावर प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण आहे. एका हातात गदा तर एका हातात संजीवनी पर्वत आहे. पायात अहिरावणाची आराध्य देवी आहे आणि हनुमानाच्या मांडीवर भरतने मारलेल्या बाणाचे चिन्ह आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की ही मूर्ती एकाच दगडातच कोरलेली आहे. 
 
राजस्थान येथून आणलेली मूर्ती - 
मूर्तीच्या विषयी सांगितले जाते की रियासत काळात सुमारे 250 ते 300 वर्षांपूर्वी राजस्थानचे एक व्यापारी आपल्या बैलगाडीत मारुतीच्या मूर्तीला ठेवून विकण्यासाठी घेऊन जातं होता. तो व्यापारी विश्रांती घेण्यासाठी थांबला. बैलगाडीत ठेवलेली 9 फुटी लांब आणि साडेतीन फुटी रुंद अश्या भल्या मोठ्या मूर्तीला बघून तिथल्या लोकांची श्रद्धा वाढली आणि त्यांनी बागली राज्याच्या राजास मूर्ती विकत घेऊन प्रतिष्ठा करविण्याची विनवणी केली. यावर राजाने स्वतः तिथे येऊन मूर्तीला बघून व्यापार्‍याला पैसे सांगण्यास सांगितले. पण व्यापार्‍याने मूर्ती अजून कोणाला तरी विकायची असल्याचे सांगितले. 
 
व्यापार्‍याने निघायची तयारी केली पण बघतो तर काय, बैलगाडी एक इंच देखील सरकली नाही. यावर राजाने हत्तीला बोलावून बैलगाडी पुढे खेचली पण बैलगाडी अजिबात सरकली सुद्धा नाही. त्यानंतर त्या व्यापार्‍याने सुवर्णमुद्रा घेऊन मूर्तीचा सौदा केला आणि बागली रियासतने छत्रपती हनुमानाचे देऊळ बनवले.  
 
तीन वेळा रूप बदलतात प्रभू -
सध्या देऊळाचे पुजारी मधुसूदन शर्मा सांगतात की ही त्यांची चवथी पिढी आहे. आणि आम्ही पिढीनं पिढी या देऊळात पूजा करतं आहोत. त्यांच्यामते सर्वात आधी रियासत काळात पंडित श्रीराम शर्मा यांनी देऊळाची पूजा करण्यास सुरुवात केली. पंडित शर्मा सांगतात की देवांनी इथल्या स्थळाची निवड स्वतःहून केली होती. बैलगाडी पुढे हालवता आली नाही. आणि देऊळाची निर्मिती इथेच झाली. त्यांनी हे देखील सांगितले की मूर्तीचे रंग नैसर्गिकरीत्या त्वचेचे आहे आणि दिवसांदिवस त्याचे सौंदर्य खुलूनच दिसत आहे. 
 
इथे देव दिवसातून तीन वेळा आपले रूप बदलतात. सकाळच्या वेळेस देवांच्या चेहऱ्यावर बालपण दिसतं तर दुपारी तारुण्यावस्थेत देवांचं गांभीर्य रूप दिसतं तर संध्याकाळी वृद्धावस्था दिसते. यामध्ये देव आपल्या संरक्षकासारखे दिसतात. पंडित शर्मा असे ही सांगतात की इथे जे भाविक आपली मनातील इच्छा घेऊन येतात त्यांची सर्व इच्छा पूर्ण होते. 
 
मूर्तीमध्ये रामायण काळातील चार घटनाक्रम आढळतात- 
या मूर्तीमध्ये रामायण काळातील चार घटना आढळतात. देवांच्या एका हाती संजीवनी पर्वत आहे, खांद्यावर प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण बसले आहे. देवांच्या मांडीवर भरत यांनी मारलेल्या बाणाचे नैसर्गिक डाग आहे. तसेच त्यांच्या पायाशी पाताळच्या राजा अहिरावणाची आराध्य देवी आहे. या देवाची मूर्ती एकाच दगडाने कोरलेली आहे. आता असा हा दगड कोठेही आढळत नाही. 
 
वर्ष 2005 मध्ये या देऊळाची पुनर्बांधणी केली होती: 
या देऊळाची पुनर्बांधणी वर्ष 2005 मध्ये केली गेली ज्यामध्ये सार्वजनिक निधी एकत्र करून देऊळाची निर्मिती करून सजविले होते. या बांधकामात सुमारे 22 लाख रुपये पेक्षा जास्त खर्च आला होता.
 
सामाजिक अंतराचे पालन - 
यंदाच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन आणि कर्फ्यूमुळे होणारा सोहळा रद्द करण्यात आला. इथे रात्रीच्या वेळी अल्पसंख्याक भाविक एकत्र होऊन लघु रुद्राभिषेक, शृंगार आणि महाआरती केली गेली. हे करताना सामाजिक अंतर राखले गेले. लोकांनी रांगेत येऊन देवांचे दर्शन केले आणि आरती आणि प्रसाद देखील त्यांचा जागेवरच देण्यात आले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती