मारुतीची पूजा करीत असल्यास हा लेख आवर्जून वाचा

सोमवार, 22 जून 2020 (22:41 IST)
पूजा करताना लक्षात ठेवून या 10 सावधगिरी बाळगा....
मारुतीची पूजा केल्याने ग्रहांचा दोष नाहीसा होतो. मारुती आणि सूर्यदेव हे एकमेकांचे स्वरूप आहे, ह्यांची मैत्री खूप प्रबळ सांगितली आहे. म्हणून मारुतीची पूजा करणाऱ्या  साधकांमध्ये सूर्य तत्त्व म्हणजेच आत्मविश्वास, ओजस्वी, आणि तेज हे गुण येतातच. पण या 10 गोष्टी लक्षात ठेवा. 
 
* मारुतीच्या पूजेमध्ये शुद्धता आणि पावित्र्य असणं आवश्यक आहे.
* नैवेद्य साजूक तुपाचे असायला हवे.
* मारुतीला तिळाच्या तेलामध्ये मिसळून शेंदराचं लेप लावावे.
* मारुतीला केशर मिसळून लाल चंदन लावावे.
* फुलांमध्ये लाल, पिवळे मोठे फुल वाहावे. कमळ, झेंडू, सूर्यफूल अर्पण केल्याने मारुती प्रसन्न होतात.
* नैवेद्यामध्ये सकाळी पूजेमध्ये गूळ, गोळा नारळ आणि लाडू, दुपारी गूळ, तूप आणि गव्हाच्या पोळीचा चुरा अर्पण करावं. रात्री आंबा, पेरू, केळी सारख्या फळांचा नैवेद्य दाखवावा.
* लागवडीच्या काळात ब्रह्मचर्य पाळणे बंधनकारक आहे.
* मारुतीला अर्पण केलेले नैवेद्य साधकानेच स्वीकारले पाहिजे.
* मंत्र जप नेहमी बोलून केले जाऊ शकते. मारुतीच्या मूर्तीच्या सामोरी बसून त्यांचा डोळ्यात बघून मंत्र जप करावा.
* साधनेसाठी 2 प्रकाराची माळ वापरली जाते. सात्त्विक कार्याशी निगडित साधना करण्यासाठी रुद्राक्ष माळ आणि तामसी पराक्रमी कार्यासाठी कोरल माळ वापरतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती