द्रौपदी बनली सैरेंध्री, तिच्यावर पडली कीचकाची वाईट दृष्टी, जाणून घ्या महाभारतातील ही दुर्मिळ कथा

बुधवार, 29 एप्रिल 2020 (17:17 IST)
महाभारतात पांडवांना 12 वर्षाचे वनवास आणि 1 वर्षाचे अज्ञातवास मिळाले होते. या अज्ञातवासाची अशी अट होती की या काळात पांडवांची ओळख पटली तर पांडवांना परत 12 वर्षाचे वनवास आणि 1 वर्षाचे अज्ञातवासाची शिक्षा भोगावी लागणार. 
 
12 वर्षाचा वनवासात काढल्यावर ते 1 वर्षाच्या अज्ञातवासाची शिक्षा भोगण्यासाठी विराट नगर येथे पोहोचतात. तिथे एका झाडाच्या खाली बसून ते आपापसात विचार मंत्रणा करतात. युधिष्ठिर म्हणतात की मी राजा विराटकडे कंक नावाच्या ब्राह्मण वेषात आश्रय घेईन. भीमाला वल्लभ म्हणून स्वयंपाकघर सांभाळायला सांगितले. अर्जुनला बृहनला म्हणून स्त्रीवेष घेऊन राज कन्येला संगीत आणि नृत्याची शिक्षा देण्यास सांगितले. नकुलला ग्रांथिक नावाने घोड्यांचे रक्षण करण्यास सांगितले. तर सहदेवाने तंत्रपाल नावाने मेंढपाळ म्हणून राहावे अशी सूचना दिली. सर्व पांडवांनी आपापली शस्त्रे शमीच्या झाडांवर लपविली आणि वेष बदलून विराट नगरात प्रवेश केला. 
 
राजा विराटने या सर्वांच्या प्रार्थना स्वीकारून त्यांना आपल्या महालात आश्रय दिले. विराटची पत्नी सुदेष्णा राणी द्रौपदीच्या सौंदर्यावर मोहित झाली असून तिने द्रौपदीची निवड आपल्या केशरचना करविण्यासाठी केली. द्रौपदीने आपले नावं सैरेंध्री ठेवले आणि राणी सुदेष्णाची दासी झाली. 
 
एक दासी म्हणून जगणे द्रौपदीला अवघडच होते. पण तिने स्वतःला सांभाळून समजूतदारीने वागून कार्य केले आणि त्यांचे काहीही गूढ कोणालाच कळू नये याची खबरदारीही घेतली. असे करून ती सैरंध्री नावं ठेवून पांडवांपासून लांब गेली. 
 
अशा प्रकारे घडला हा प्रसंग 
राजाच्या सैनिकाने तिला महालाच्या जवळपास फिरताना बघितल्यावर तिला पहारेकरांनी राणीच्या दासींच्या स्वाधीन केले. दासींनी तिला महाराणी सुदेष्णाकडे नेले. राणी सुदेष्णाने तिला निरखून बघितले आणि विचारले की तू कोण आहेस ? 
 
महाभारतामध्ये ह्या गोष्टीचे वर्णन केलेले आहे की द्रौपदीची सैरेंध्री कशी काय बनते ? कशी ती राणीची दासी बनली ? कशी राजमहालामध्ये तिची नेमणूक झाली ? याची एक अद्भुत कथाच आहे. 
 
सैरेंध्रीला सुदेष्णाने विचारल्यावर की कोण आहेस तू ?  द्रौपदी चिडते आणि सुदेष्णाला म्हणते की मी कुणीही असो असो, मला इथे कशाला आणलेस ? राणी तिचे अशे उद्गार ऐकून रागावते. त्यावर सैरेंध्री म्हणते की मला अश्या पद्धतीने आणल्याचे माझ्या पतीला कळल्यावर ते आपल्या सैनिकांचे संहार करतील. ते फारच रागीट स्वभावाचे आहेत. आपल्याला माझ्या पतीचे सामर्थ्य ठाऊक नाही. राणी सुदेष्णेला हे लक्षात येते की ही कोणी साधारण स्त्री नाही. तुझे पती कुठे आहे ? असे विचारल्यावर ती सांगते की ते परदेशात गेले आहे आणि असे असताना माझ्या सासऱ्याने मला घरातून बाहेर काढून टाकले आहे. 
 
तुझ्या सासऱ्यांना आम्ही सांगतो आणि समजावतो. राणीने असे म्हटल्यावर द्रौपदी त्यांना सांगते की ह्याचा काहीच उपयोग नाही. आमचे गंधर्व विवाह झाल्यामुळे ते आमचा स्वीकार करत नाही. आता मला राहण्यासाठी जागाच नाही. आत्ता मी आपल्याला काहीच सांगू शकत नाही. जर का माझ्या पतीने आल्यावर माझा स्वीकार केला नाही तर मी आपणास त्यांचे नाव आणि माझ्या सासऱ्यांचे नाव सांगीन. 
 
राणीला सैरेंध्रीच्या बोलण्यावर विश्वास बसते आणि राणी तिला विचारते की आपल्याला केश रचनांचे कार्य ठाऊक आहे का ? आपले स्वतःचे केस तर मोकळे सोडले आहे. त्यावर सैरेंध्री उत्तरते की मी माझी केस रचना फक्त माझ्या पतीसाठी करत असते ते परदेशातून आल्यावर त्यांच्या साठी पुन्हा केशरचना आणि शृंगार करीन. राणीने तिला तिच्या गोष्टीचा पाठ पुरावा देण्यासाठी केस रचनेची प्रात्यक्षिक देण्यास सांगितले. सैरेंध्रीने राणीच्या केशांची उत्तम केस रचना करून राणीला थक्क करते. राणी आपली दासी म्हणून तिला नेमते. अश्या प्रकारे सर्व पांडवांनी विराट राजाच्या नगरात आपआपली जागा पटकावली. 
 
कीचकाची वाईट दृष्टी सैरेंध्री वर पडते..
एकदा महाराज विराट यांचा मेहुणा आपल्या बहिणी सुदेष्णाला भेटावयास तेथे येतो. त्याची दृष्टी सैरेंध्री वर पडताच त्या क्षणी तो तिच्या सौंदर्याला भूलीस पडतो, आणि सैरेंध्रीला भेटावयाचे निमित्त शोधू लागतो. 
 
एकांतात तो सैरेंध्रीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न देखील करतो. सैरेंध्री (द्रौपदी) हे सर्व घडलेले भीम (वल्लभाला ) सांगते. त्यावर भीम तिला कीचकाला मध्यरात्रीला नृत्य शाळेमध्ये बोलविण्यास सांगतो आणि तिथेच त्याचे वध करण्यात येईल असेही सांगतो. त्या प्रमाणे तो कीचकाचा वध देखील करतो. दुसऱ्याच दिवशी विराट नगरात बातमी पसरते की सैरेंध्रीच्या सामर्थ्यवान पतीने कीचकाचा वध केला. त्यानंतर ही बातमी हस्तिनापुरामध्ये दुर्योधनाला देखील समजते आणि तो आपल्या गुप्तहेरांना विराट नगरामध्ये पांडवांची हेरगिरी करावयास पाठवतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती