देवघरात नका ठेवू या मूरत्या

वास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित केले जाणार्यात मूरत्यांच्या जीवनावर प्रभाव पडतो तर जाणून घ्या कोणत्या मुरत्या देवघरात ठेवू नये:
देवी लक्ष्मीची उभी मूरती किंवा चित्र
देवी लक्ष्मी नेहमी विराजमान स्वरूपात असली पाहिजे. लक्ष्मीची उभी मुद्रा असलेली मूरती किंवा चित्र ठेवल्याने घरात धन टिकून राहत नाही.
 
दुर्गादेवीची विध्वंशकारी स्वरूप
दुर्गा देवी साक्षात शक्ती स्वरूप आहे. ‍देवीने अनेक राक्षसांचे वध केले आहे म्हणून संघारक स्वरूपातही देवीची पूजा केली जाते. परंतू देवघरात विध्वंशकारी स्वरूपात असलेली देवीचे फोटो लावू नये.

 

नटराज मूर्ती
नटराजची मूर्ती वास्तवमध्ये महादेवाच्या तांडव स्वरूपाची मूर्ती आहे. महादेव जेव्हा क्रोधित होतात तेव्हा तांडव करतात. महणून घरात नटराजची मूर्ती ठेवल्याने क्रोध आणि आवेशची भावना वाढते. घरात सुख-शांती हवी असल्यास नटराजची मूर्ती ठेवू नये.
 
भैरवनाथ मूर्ती
भैरवनाथ महादेवाचे स्वरूप आहे ज्यांची सवारी कुत्रा आहे. भैरवनाथाची पूजा विधी सोपी नाही. भैरवनाथांना प्रसन्न करण्यासाठी श्मसानातील राख आणि तंत्र-मंत्राची आवश्यकता असते. म्हणून घरातील मंदिरात यांची पूजा करणे योग्य नाही. आणि यांची मूर्ती किंवा फोटोही ठेवायला नको.

शनीदेवाची मूर्ती
शनीवदेवाची मूर्ती घरातील मंदिरात ठेवू नये. शनीदेवाची पूजा नेहमी शनी मंदिरात जाऊन केली पाहिजे कारण शनीदेवाची पूजा करताना काही नियम पाळावे लागतात.
एकाच देवाच्या दोन मुरत्या
घरातील मंदिरात एकाच देवाच्या दोन मुरत्या ठेवू नये. अशामुळे नात्यांमधील ताण वाढतो. जर आपल्या मंदिरात एकाच देवाच्या दोन मुरत्या आहे तर त्यांना जवळपास ठेवण्याऐवजी अमोर-समोर ठेवा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती