देव-दोष म्हणजे काय ? जाणून घ्या आगळी वेगळी माहिती

गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (14:59 IST)
ज्योतिशास्त्राच्या मान्यतेनुसार, प्रथम भाव म्हणजे कुळदोष शरीर वेदना, द्वितीयभाव आकाश देवी, तृतीयभाव अग्निदोष, चतुर्थ भाव प्रेत दोष, पंचम भाव  देवी-देवांचा दोष, सहावा भाव ग्रहदोष, सातवा भाव लक्ष्मी दोष, आठवा भाव सर्पदोष, नववा भाव धर्मस्थान दोष, दहावा भाव पितृ दोष, लाभ भाव ग्रहदशा दोष, व्यय भाव मागील जन्माचे ब्रह्मदोष असतात. 
 
असे म्हणतात की एखादा ग्रह कोणत्या भावाने पीडित असल्यास, सूर्य दोन ग्रहांमुळे ग्रासलेले असल्यास ज्या घरात असतो तो दोष मानतात. इथे आपण देव दोष कशामुळे लागतो ह्या मागील कारणे जाणून घेऊ या. तसेच या पासून वाचण्याचे काही उपाय देखील जाणून घेऊ या.
 
सर्वप्रथम आपण देव ऋणांबद्दल जाणून घेऊ या -
देवदोष आणि देव ऋण यात अंतर आहे. ऋण चार असतात - देव ऋण, ऋषी ऋण, पितृ ऋण आणि ब्रह्मा ऋण. असे मानले जाते की देव ऋण भगवान विष्णूंचे असते. हे ऋण उत्तम चारित्र्य ठेवून दान आणि यज्ञ करून फेडले जातात. जे लोक धर्माचा अपमान करतात किंवा धर्माबद्दल भ्रम पसरवतात किंवा वेदांच्या विरुद्ध वागतात, त्यांच्यावर हे ऋण दुष्परिणाम करण्याचे सिद्ध होतात. 
 
देव दोषाचे 5 कारणे - ज्योतिषानुसार देव-दोष पूर्वीच्या पूर्वजांकडून वडिलधाऱ्यांकडून चालू असून याचा संबंध देवांशी असतो.

1 असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीने किंवा त्याचा कुटुंबीयांनी त्यांचे पूर्वज, गुरू, पुजारी, कुळदेवी किंवा देवांना मानने सोडले असल्यास हा दोष सुरू होतो.  

2 असे देखील असू शकते की हे सर्व या गोष्टींवर विश्वास ठेवत असणार पण त्यांनी किंवा त्यांच्या पूर्वजांनी कधी तरी पिंपळाचे झाड कापले असणार किंवा एखाद्या देवस्थळाला तोडले असणार तरी देखील देवदोष सुरू असतो.

3 बऱ्याचदा असे ही घडते की एखाद्या व्यक्तीने किंवा त्याचा कुटुंबीयातील सदस्याने एखाद्या संत, साधू किंवा कोणत्यातरी विचारधारेच्या प्रभावाखाली येऊन देवी-देव कुळाचाराला मानायचे सोडले असेल किंवा नास्तिक झाल्यावर हा प्रकार घडून येतो.
 
4 असे मानतात की एखाद्या देव-देवीकडे नवस मागितल्यावर ते नवस पूर्ण झाल्यावर देखील नवस फेडत नाही अशा परिस्थितीत देखील देव-दोष लागतो. असे देखील होत की एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजांनी नवस मागितले असणार आणि त्या नवसाला फेडले नसणार. जवळजवळ प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एखाद्या तीर्थक्षेत्र किंवा देवस्थळी जाऊन नवस मागतो की आमची ही इच्छा पूर्ती व्हावी आम्ही हे पूर्ण झाले की आपल्याला पूजा भेट, नैवेद्य, दर्शन इत्यादी करू. पण प्रत्यक्षात असे करत नाही. असे नवस पूर्ण न केल्यानं देखील हा दोष लागतो.
 
5 असे देखील असू शकतं की एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजांनी आपले धर्मपरिवर्तन केले असणार आणि तो दुसऱ्या देवाला मानत असणार तर त्याने केलेल्या कर्माचे फळ त्याच्या मुलांना भोगावे लागतात. गीतेमध्ये श्रीकृष्णांनी स्वधर्म आणि कुळधर्माबद्दल तपशीलवार वर्णन केले आहे. ज्योतिषानुसार याचा संबंध बृहस्पती आणि सूर्याशी असतो. बृहस्पती नीच आणि सूर्य देखील नीच असल्यास किंवा दोन्ही ग्रह एखाद्या वाईट ग्रहाच्या फेर्‍यात अडकल्यास देखील असे मानतात की जातकाच्या कुळाचे धर्म बदलले असणार.
 
या दोषाचा प्रभाव - या दोषाचा प्रभाव पहिले मुलांवर होतो. अपत्ये होत नाही, अपत्ये असतात तर ते देखील खूप त्रास देणारे असतात. आयुष्य कधीही आनंदाने निघत नाही, निघतं असलं तरी कोणते न कोणते त्रास उद्भवतात. आजारपण, दुःख, असतातच याचा दुसरा प्रभाव नोकरी आणि व्यवसायांवर पडतो या मध्ये स्थैर्यता येत नसते. 
 
उपाय - या दोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी आपल्या कुळदेव किंवा देवी आणि कुळधर्माचे पालन करावे. उत्तरमुखी असलेल्या घरात राहावे आणि एखाद्या ठिकाणी एक पिंपळाचे झाड लावून त्याची सेवा करावी. घरात गीतेच्या पाठाचे आयोजन करावं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती