हिंदू पंचांगात मुहूर्त आणि चौघडियाचे महत्त्व

गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (13:55 IST)
हिंदू पंचांग आणि ज्योतिषानुसार जेव्हा मुहूर्त नसल्यास कोणतेही कार्य शीघ्र आरंभ करायचे असल्यास किंवा प्रवासावर जायचं असल्यास चौघडिया मुहूर्त बघून कार्य करणे उत्तम ठरतं.
 
चौघडिया मुहूर्त ज्योतिष्यामधील एक अशी सारणी आहे ज्यात खगोलशास्त्रीय स्थितीच्या आधारे दिवसाच्या 24 तासांची दशा कळते. दिवस आणि रात्रीचे आठ-आठ भागाचे एक चौघडिया असतं. अर्थात 12 तासाचा दिवस आणि 12 तासांंची रात्र यात प्रत्येक 1.30 मिनिटाचा एका चौ‍घडिया असतो.  
चौघडिया सूर्योदयापासून प्रारंभ होतो. सात चौघडियानंतर पहिला चौ‍घडियाच आठवा चौघडिया असतं. साती वारांसाठी वेगवेगळे चौ‍घडिया असतात.

सामान्यतः: श्रेष्ठ चौघडिया शुभ, चंचल, अमृत आणि लाभ मानले गेले आहे. उद्वेग, रोग आणि काल नेष्ट मानले गेले आहे. प्रत्येक चौघडियाचा ग्रह स्वामी असून त्या काळात तो बल प्रधान मानला जातो. उद्वेग- रवी, चंचल- शुक्र, लाभ- बुध, अमृत- चंद्र, काल- शनी, शुभ- गुरु, रोग- मंगळ ग्रह स्वामी आहे.  
कोणीही लोखंड किंवा तेलासंबंधी व्यापार सुरू करता असल्यास त्यांच्यासाठी शनी प्रभावित काल चौघडिया उत्तम फलदायी सिद्ध होऊ शकतं.
 
त्याच प्रकारे एखाद्या व्यक्तीला पूर्व दिशेकडे प्रवास करायचा असल्यास जर त्याने अमृत चौघडियामध्ये प्रवास सुरू केला तर हे त्यासाठी नुकसानदायक सिद्ध होऊ शकतं कारण अमृत चौघडियाचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्र पूर्व दिशा शूलाच कारक आहे ज्यामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात.
 
ज्या चौघडियाचा स्वामी ज्या दिशेत दिशाशूलचा कारक असेल त्या दिशेत प्रवास करणे वर्जित मानले गेले आहे. काही गोष्ट वगळून सामान्यतः: चौघडिया मुहूर्त उत्तम आणि इच्छित परिणाम देणारे असतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती