चंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा

* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान करावे.
* मान सन्मान प्राप्तीसाठी ग्रहणानंतर कोरडी मिठाई दान करावी.
* आपण आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल तर ग्रहणानंतर रसदार गोड पदार्थ दान करावे.
* आपल्या कुटुंबात नेहमी आजार पसरलेला असतो किंवा घरातील एखादा सदस्य बऱ्याच काळापासून आजारी असेल तर ग्रहणानंतर एका तुपाने भरलेल्या वाटीत चांदीचा तुकडा टाकून त्यात आपली सावली बघून दान करावे.
* चंद्र ग्रहणाच्या पुढल्या दिवशी मुंग्या आणि मासोळ्यांना आहार द्यावा. असे केल्याने सर्व कष्टांपासून मुक्ती मिळते.
 
* विशेष: ग्रहण सुटल्यावर सर्वात आधी अंघोळ करावी नंतर दान करावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती