गुरुवारी या झाडाची पूजा करावी

गुरूवार, 1 ऑक्टोबर 2020 (06:52 IST)
आपल्या हिंदू धर्मात केळीच्या झाडाला अतिशय पवित्र मानले आहे. म्हणून केळीच्या झाडाची पूजा केली जाते. शुभ कार्यात देखील केळीच पानं आणि केळीच्या झाडाची पूजा करण्याचं विधान आहे. धर्म मान्यतेनुसार गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केली पाहिजे. असे म्हणतात की जो कोणी भक्त गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करतं त्याला भगवान श्रीविष्णूचा आशीर्वाद मिळतो. तसेच केळीच्या झाडाची पूजा केल्यानं घरात धन -संपत्ती येते.
 
अशी आख्यायिका आहे की केळीच्या झाडात खुद्द विष्णूजींचा वास असतो. गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करणाऱ्यावर ते प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना सौख्य, भरभराट, शांती, आनंदाचा आशीर्वाद देतात. केळीच्या झाडाला शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. 
 
वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात-
जर आपल्या कुंडलीत गुरुची स्थिती खराब असल्यास आणि आपल्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असल्यास आपण एखाद्या ज्योतिषाला विचारून बृहस्पती देवाचे उपवास करावे आणि केळीच्या झाडाची पूजा करावी. असे केल्यानं आपल्या कुंडलीत असलेले गुरु ग्रह बळकट होतील, आणि लग्नातील अडथळे दूर होतील.
 
केळीच्या झाडा खाली दिवा लावा-
श्री विष्णू पिवळे कपडे घालतात. म्हणून त्यांना पीताम्बरधारी देखील म्हणतात. गुरुवारी पिवळे कपडे घालून केळीच्या झाडा खाली दिवा लावावा. असे केल्यानं श्री विष्णूंची कृपादृष्टी मिळते.
 
गुरुवारी हे करू नये - 
गुरुवारी केस धुऊ नये, किंवा साबणाचा आणि शॅम्पूचा वापर करू नये. गुरुवारी दररोजची स्वच्छता करण्याव्यतिरिक्त कोणतीही स्वच्छता करू नये. गुरुवारी एखाद्या काळ्या गायीला पिवळे लाडू खाऊ घालावे असे केल्यानं आपले अडकलेले पैसे मिळतात. आणि मालमत्तेच्या वादातून देखील सुटका होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती