साई बाबा हिंदू असल्याचे 10 तथ्य जाणून घ्या

सोमवार, 11 जानेवारी 2021 (12:33 IST)
साई बाबांनी आपले प्रारंभिक जीवन मुस्लिम फकिरांसह घालवले, पण त्यांनी कोणाशीही कोणतेही व्यवहार धर्माच्या आधारे केले नव्हते. त्यांच्यासाठी हिंदू-मुस्लिम एकसारखेच होते. ते मुस्लिम लोकांना भेटल्यावर म्हणायचे की राम चांगले करतील आणि हिंदूंना भेटल्यावर म्हणायचे 'अल्लाह मालिक आहे'. चला जाणून घेऊ या साईबाबा हिंदू असल्याचे 10 तथ्य.

1 बाबा धुनी रमवायचे. धुनी केवळ शैव आणि नाथपंथी संतच पेटवतात.
 
2 बाबांचे कान टोचलेले होते. हे कान टोचणे केवळ नाथपंथींमध्ये होते.
 
3 साईबाबा प्रत्येक आठवड्यात नाम कीर्तनाचे आयोजन करायचे ज्यामध्ये विठ्ठलाचे भजन म्हणायचे. बाबा म्हणायचे की -ठाकूरनाथाची डंकपुरी, विठ्ठलाची पंढरी, रणछोडदासची द्वारिका हीच तर आहे.
 
4 साईबाबा कपाळी कुंकू आणि चंदन लावायचे.
 
5 बाबा ज्या ठिकाणी लोकांना दिसले त्या जागेवर बाबांच्या गुरुचे तपस्थान होते. समाधीला खणल्यावर तेथे 4 दिवे तेवत होते. म्हाळसापती आणि शिरडीचे इतर भक्त या जागेला बाबांच्या गुरुचे समाधी-स्थळ म्हणून अभिवादन करायचे.
 
6 साईचे जाणकार लोक मानतात की ते नाथ संप्रदायाचे पालन करायचे. हातात पाण्याचे कमंडलु ठेवायचे, धुनी रमवायचे, हुक्का पिणं, कान टोचणे आणि भिक्षावळी मागायचे. हे सर्व नाथ पंथीय साधूंचे लक्षण आहेत. नाथांमध्ये धुनी लावणे आवश्यक आहे. तर इस्लाम मध्ये आग हे चांगले मानले जात नाही. या एका कर्मानेच त्यांचे नाथपंथी असल्याचे सिद्ध होतो.
 
7 हिंदू धर्मामध्ये अशी प्रथा आहे की जेव्हा एखाद्या माणसाचा शेवटचा काळ जवळ येतो तेव्हा त्याला धार्मिक ग्रंथ वाचून ऐकवले जाते. प्रामुख्याने गीता ऐकविण्याची पद्धत आहे, कारण गीता हे वेदांचे सार आहे आणि थोडक्यात देखील आहे.
 
8 जेव्हा बाबांना वाटले की आता जाण्याची वेळ आली आहे, तेव्हा त्यांनी श्री वझे ह्यांना 'रामविजय प्रकरण' ऐकविण्याची आज्ञा दिली. श्री वझे ह्यांनी एका आठवड्यात दररोज आठी प्रहर पठण केले. नंतर लक्ष्मीबाई शिंदे ह्यांना 9 नाणी दिल्यावर बाबांनी म्हटले की आता मला या मशीदीत आवडत नाही म्हणून मला बुटीच्या दगडी वाड्यात घेऊन चला. तिथे मी आनंदात राहीन. हेच अखेरचे शब्द त्यांच्या श्रीमुखातून बाहेर आले.
 
9 महाराष्ट्र्राच्या परभणी जिल्ह्यात पाथरी गावात साईबाबांचा जन्म झाला. साईंच्या वडिलांचे नाव गोविंदभाऊ आणि आई चे नाव देवकी अम्मा असे होते. काही लोक त्यांच्या वडिलांचे नाव गंगाभाऊ सांगतात आणि आईचे नाव देवगिरी अम्मा म्हणतात. देवगिरीला पाच मुलं होती पहिला मुलगा रघुपत भुसारी, दुसरा दादा भुसारी, तिसरा हरिबाबू भुसारी, चवथा अंबादास भुसारी आणि पाचवा बळवंत भुसारी. साईबाबा गंगाभाऊ आणि देवकीचे तिसरे मुल होते. त्यांचे नाव होते हरिबाबू भुसारी. साईबाबांच्या घरा जवळच एक मुस्लिम कुटुंब राहत होते. त्या कुटुंबाचे प्रमुख होते चांद मिया आणि त्यांची पत्नी चांद बी होत्या. त्यांना काही अपत्ये नव्हते. हरीभाऊ म्हणजे साईबाबा त्यांच्याच घरात जास्त काळ घालवायचे. चांद बी त्यांना आपल्या मुलाप्रमाणे मानत होत्या. या व्यतिरिक्त साईबाबांच्या जीवनात एक चांद पाशा पाटील ह्यांचे नाव देखील येत जे धूपखेडाचे मुस्लिम जागीरदार होते. त्यांचा घोडा गहाळ झाल्यावर साई बाबांनी हाक मारून त्याला बोलविले होते. शिरडी येण्यापूर्वी साईबाबा धूपखेड्यात ह्याच चांद पाशा पाटील ह्यांच्या कडे थांबले होते. तिथूनच ते वऱ्हाडीत दुसऱ्यांदा शिरडीमध्ये आले आणि स्थायिक झाले.
 
10 साई बाबांचे वंशज अजून देखील औरंगाबाद, निजामाबाद आणि हैदराबाद येथे राहतात. साईचे मोठे बंधू रघुपती ह्यांना 2 मुलं होती -महारुद्र आणि परशुराम बापू. महारुद्राचे मुल रघुनाथजी होते. ज्यांच्या कडे पाथरीचे घर होते. रघुनाथ भुसारी ह्यांना दोन मुलं आणि एक मुलगी असे दिवाकर भुसारी, शशिकांत भुसारी आणि एक मुलगी जी नागपुरात आहे. दिवाकर हे हैदराबाद मध्ये आणि शशिकांत निजामाबाद येथे राहतात. परशुराम ह्यांच्या मुलाचे नाव भाऊ होते. भाऊ ह्यांना प्रभाकरराव आणि माणिकराव नावाचे 2 मुलं होती. प्रभाकर रावांना प्रशांत, मुकुंद, संजय नावाचे मुलं आणि लता पाठक नावाची मुलगी आहे जे औरंगाबाद येथे राहतात. माणिकराव भुसारी ह्यांना 4 मुली आहे -अनिता,सुनीता,सीमा आणि दया.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती