हनुमान जयंती विशेष : मारुतीच्या जन्माच्या वेळेची 6 रहस्ये जाणून घ्या

रविवार, 5 एप्रिल 2020 (15:26 IST)
रामभक्त हनुमान हे सर्व शक्तिमान आणि सर्व ज्ञानी आहे. संशोधनाच्यानुसार प्रभू श्रीराम यांचा जन्म 5114 इ.स.पूर्वी अयोध्येत झाला होता. पण हनुमानाच्या जन्माचे ठिकाणाबद्दल काहीही स्पष्टता नाही. त्यांचा जन्म कपिस्थळ किंवा किष्किंधा येथे झाला असे म्हणतात. 
 
1 उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हनुमान जयंती वेग-वेगळ्या तारखेला साजरी केली जाते. तामिळनाडू आणि केरळात मार्गशीर्षाच्या अवसेला तर ओरिसामध्ये वैशाख महिन्याचा पहिल्या दिवशी साजरी केली जाते.
 
2 हिंदू केलेंडरनुसार हनुमानाचा जन्म मेष लग्नात चैत्र पौर्णिमेचा चित्र नक्षत्रात सकाळी 6:03 वाजता एका गुहेत झाला होता. म्हणजेच ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार मार्च किंवा एप्रिल दरम्यान.
 
3 वाल्मीकी ऋषींच्या रामायणानुसार हनुमानाचे जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मेष लग्न, स्वाती नक्षत्रास मंगळवारी झाला. म्हणजेच हनुमान जयंती सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान येते.
 
4 असे म्हटले जाते की ह्याची एक तिथी (चैत्र) विजय महोत्सव आणि दुसरी तिथी (कार्तिक) वाढदिवसाच्या रूपात साजरी केली जाते. 
 
5 पहिल्या तारखेनुसार या दिवशी हनुमान सूर्याला फळ समजून खाण्यासाठी गेले. त्याच दिवशी राहू देखील सूर्याला गिळण्यासाठी आला होता पण मारुतीला बघून सूर्याने त्यांना दुसरे राहूच समजले. हा दिवस चैत्रमासातील पौर्णिमा असे. पण त्यांचा जन्म कार्तिकातील कृष्ण चतुर्दशीला झाला.
 
6 एक अन्य मान्यतेनुसार माता सीतेने मारुतीची भक्ती आणि समर्पण बघून त्यांना अमरत्वाचे वरदान दिले. हा दिवस नरक चतुर्दशीच्या होय. 
 
शेवटी असे म्हटले जाईल की हिंदू दिनदर्शिकेच्यानुसार हनुमान (मारुती) चा जन्म दोन तारखेनुसार साजरा केला जातो. पहिल्या चैत्र महिन्यातील पौर्णिमेला आणि दुसरा कार्तिक महिन्यातील चतुर्दशीला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती