गुजराती रेसिपी : थेपले

2 वाट्या कणीक, 1 मेथीची जुडी, आर्धी कोथिंबीरची जुडी, अलां, 3-4 हिरव्या मिरच्या, अर्धा लहान चमचा तिखट, चिमूटभर जिरं, 2 मोठे चमचे गूळ, 2 मोठे चमचे दही, 1 मोठा चमचा तेल, 1 लहान चमचा मीठ.
 
कृती : सर्वप्रथम कणीक चाळून घ्यावी. मेथी व कोथिंबीर निवडून धुवून बारीक चिरावी. कणकेत तेल, मीठ घालून सारखी करावी. त्यात सर्व मसाला आणि मेथी, कोथिंबीर घालावी. दह्यात गूळ विरघळवून त्यात पीठ घट्ट भिजवाव. गरज वाटली तर पाण्याचा हात लावावा. पेढ्याएवढा गोळा करून पुरीसारखे लाटून तव्यावर टाकून शेकावे. गरमागरम  सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करावे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती