गुजराती समोसा

मंगळवार, 26 मार्च 2019 (11:41 IST)
साहित्य सारणासाठी : एक कप भिजवलेले पोहे, मिक्स भाज्या, बटाटा, गाजर, बीन्स, फ्लॉवर, सिमला मिरची, एक टेबलस्पून तीळ, हिंग, मोहरीची फोडणी, धने-जिरेपूड, आलं, हिरवी मिरची वाटून, लिंबाचा रस, साखर, मीठ, तिखट.
 
कृती : फोडणी बनवा. त्यात आलं, मिरच्या तीळ घाला. वाफलेल्या भाज्या घाला. पोहे घाला. गार झाल्यावर धने-जिरेपूड, मीठ, साखर, लिंबाचा रस, कोथिंबीर घाला.
 
कव्हरसाठी : दोन कप मैदा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, मीठ चवीनुसार, अंदाजाने तूप घालून घट्ट भिजवा. नेहमीप्रमाणे सारण भरून समोसे बनवून तळा. तेलात तळा.
 
खजुराच्या चणीबरोबर द्या. त्यासाठी पाव किलो खजूर, शंभर ग्रॅम चिंच, थोडा गूळ, धने-जिरेपूड, तिखट, मीठ सर्व उकळून गाळून घ्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती