गुढीपाडवा / चैत्र नवरात्रात 5 सर्वार्थ सिद्धी आणि रवि पुष्य योग

नव विक्रम संवत्सर 2076 चे शुभारंभ गुढीपाडवा म्हणजे 6 एप्रिल शनिवार रेवती नक्षत्रात होईल. या संवत्सराचे राजा शनी आणि मंत्री सूर्यदेव आहे. ज्योतिष्यांप्रमाणे हे अती शीघ्रतेने अनुसरण करणारे आहे. या दिवशी चैत्र प्रतिपदा असून नवरात्र महोत्सवाला सुरुवात होईल. नवरात्रात 5 सर्वार्थ सिद्धी योग आणि 1 रवि पुष्य असणार. 
 
नूतन विक्रम संवत्सराचा प्रारंभ 6 एप्रिलला सूर्योदयासह पहाटे 6:06 मिनिटापासून होणार. शनिवार असल्याने या नव संवत्सराचा राजा शनी आणि मंत्री त्यांचे पिता सूर्य असतील. बुध सस्येश, रसेश शुक्र व मंगल धनेश असणार. 
 
सहा दिवस विशेष योग जुळून आले आहे. चैत्र नवरात्रात पाच दिवस सर्वार्थ सिद्धी योग आणि एक दिवस रवि पुष्य योग राहिल्यामुळे या दिवसांची शुभता वाढेल. 
सर्वार्थ सिद्धी योग 
7 एप्रिल सकाळी 6:27 ते 8:43 वाजेपर्यंत
9 एप्रिल सकाळी 6:25 ते 10:18 वाजेपर्यंत 
10 एप्रिल सकाळी 6:24 ते 11 एप्रिल सकाळी 6:23 पर्यंत 
12 एप्रिल सकाळी 9:53 ते 13 एप्रिल सकाळी 6:21 पर्यंत 
14 एप्रिल सकाळी 6:20 ते 7:39 वाजेपर्यंत राहील. 
 
14 एप्रिलला रवि पुष्य योग आहे. नवरात्रात रवि पुष्य योग मंत्र आणि यंत्र साधनेसाठी विशेष फलदायी असतो. 

वेबदुनिया वर वाचा