चुरम्याचे मोदक

सामग्री  - 400 ग्रॅम गव्हाचे पीठ, 100 ग्रॅम चणा डाळीचे पीठ, 250 ग्रॅम पनीर, 700 ग्रॅम पिठी साखर, एक चमचा इलायची पूड, 100 ग्रॅम खोबर्‍याचा कीस, शुद्ध तूप़, दूध आदी.

पद्धत- दुधामध्ये गव्हाचे पीठ व बेसन पीठ मळून घ्या. त्यात पनीर मिक्स करा. दुसर्‍या बाजूला तूप गॅसवर तापवायला ठेवा. मळून झालेल्या कणकेचे लहान लहान गोळे तयार करा. त्यानंतर तुपामध्ये ते खरपूस होत नाही तोवर तळा. ते थंड झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यानंतर त्यात पिठी साखर, खोबर्‍याचा कीस, इलायचीची पूड, खवा व थोडे तूप मिसळून त्याचे लहान लहान मोदक तयार करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती