गणपती आणि संगीत, या नात्याबद्दल रोचक माहिती

शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (13:14 IST)
हिन्दू धर्माचं नृत्य, कला, योग आणि संगीत यासह खोल नातं आहे. हिन्दू धर्माप्रमाणे ध्वनी आणि शुद्ध प्रकाश याने ब्रह्मांडाची रचना झाली आहे. भारतात संगीताची परंपरा अनादी काळापासून आहे.
 
जवळपास हिंदूंच्या सर्वच देवी-देवतांचे आपले स्वतंत्र वाद्य यंत्र आहे. विष्णूंकडे शंख तर शिव यांच्याकडे डमरु आहे. नारद मुनी आणि सरस्वती यांच्याजवळ वीणा आहे तर भगवान श्रीकृष्णांकडे बासरी. देवर्षी नारद यांच्या हातात सदैव एकतारा असतो. खजुराहो असो वा कोणार्क येथील मंदिर, प्राचीन मंदिरांच्या भिंतीवर गंधर्वांच्या मूर्तींचा समावेश आहे आणि त्यांच्याकडे सर्व प्रकाराचे वाद्य यंत्र असल्याचे दर्शवले गेले आहे. 
 
सामवेद त्या वैदिक स्तोत्रांचा संग्रह आहे जे गीतमय आहे. संगीताचे सर्वप्रथम ग्रंथ चार वेदांपैकी एक सामवेद आहे. याच आधारावर भरत मुनी यांनी नाट्यशास्त्र लिहिले आणि नंतर संगीत रत्नाकर, अभिनव राग मंजरी लिहिले गेले. जगभरातील संगीताच्या ग्रंथांचे सामवेद हे प्रेरणा आहे.
 
गणपतीचे वाद्ययंत्र ढोल : गणपतीची मूर्ती आणि त्यांच्या चित्रांमध्ये वीणा, सितार आणि ढोल वाजवताना दर्शवले जाते. कुठे-कुठे त्यांना बासरी वाजवताना देखील दाखवतात. तसे तर गणपती संगती प्रेमी आहे. तरी बहुधा त्यांना ढोल आणि मृदंग वाजवताना चित्रित केले जाते. ढोल सागर ग्रंथानुसार ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी ढोलची निर्मिती केली होती. विष्णूंनी तांबा धातू गळ्याला लावला आणि ब्रह्मा यांनी त्या ढोलमध्ये ब्रह्म कनौटी लावली आणि ढोलच्या दोन्ही बाजूला सूर्य आणि चंद्र या रुपात कातडे लावले. 
 
जेव्हा ढोल तयार झाला तेव्हा भगवान शंकरांनी आनंदी होऊन नृत्य केले तेव्हा त्यांच्या घामातून एक कन्या 'औजी' ची निर्मिती झाली तिला ढोल वाजवण्याची जवाबदारी देण्यात आली. म्हणतात की औजीने ढोल आलटून पालटून चार शब्द- वेद, बेताल, बाहु आणि बाईल यांचे निर्माण केले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती