बटाट्याची जिलबी

साहित्य : बटाटे, तूप, साखर, केशर, आरारूट

कृती: बटाटे घेऊन ते वाफवून, ते बारीक वाटून घ्यावेत. एक वाटी गोळ्यास पाव वाटी आरारूट घेऊन, त्या गोळ्यात घालून गोळा चांगला मळावा. नंतर गोळ्याच्या दीडपट साखर घेऊन, त्याचा दोन तारी पाक करून, त्यात केशर घालावे. वरील बटाट्याचा गोळा जाड भोकाच्या शेवपात्रात घालून, तुपावर शेवेसारखा चवंगा पाडावा व तांबूस रंगावर तळावा व पाकात सोडावा. ही बटाट्याची जिलबी कुरकुरीत व छान लागते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती