सोप्या पध्दतीने घरीच पटकन तयार करा कुरकुरीत केळीचे वेफर्स

बुधवार, 30 मार्च 2022 (09:45 IST)
सामुग्री
कच्ची केळी, शेंगदाण्याचं तेल, मीठ
 
कृती
सर्वात आधी कच्च्या केळ्यांची सालं काढून घ्या. एका बाऊलमध्ये बर्फाचं पाणी घेऊन त्यात मीठ घालून त्यात केळी पंधरा मिनिटांसाठी भिजवून ठेवा. नंतर त्यातून केळी काढून चिप्सच्या आकारात कापून स्वच्छ कपड्यावर दहा मिनिटांसाठी पसरवून ठेवा.
 
आता कढईत तेल गरम करुन चिप्स टाकून सोनेरी होयपर्यंत तळून घ्या. जरा गार झाल्यावर वरुन मीठ आणि आवडीप्रमाणे इतर मसाले घालून स्वाद घ्या. 
 
हे चिप्स एअरटाइट डब्ब्यात ठेवल्यास पुष्कळ दिवस तसेच राहतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती