समर स्पेशल : आंब्याचे पुडींग

साहित्य :  3 आंबे, 1/2 लीटर दूध, 1 लहान पॅकेट स्ट्रॉबेरी इसेन्स, कस्टर्ड पावडर, 2-3 चमचे, 1/2 कप साखर, बदाम, काजू, पिस्ता, चेरी. 

कृती : प्रथम आंब्याची साले काढून बारीक तुकडे करा व साधारण हलक्या हाताने एकदाच कुस्करून ठेवा. दुधात साखर, स्ट्रॉबेरी इसेन्स व कस्टर्ड पावडर टाकून चांगले एकजीव करा. गॅसवर मिश्रणाचे भांडे ठेवून ढवळून दाट करा. कुठळ्या होऊ देऊ नका. मिश्रण थंड झाल्यावर त्यात आंब्याचा गर घालून हलक्या हाताने ढवळा. सर्व सुका मेवा, चेरी घालून भांडे फ्रीजमध्ये ठेवा. चांगले सेट झाल्यावर पुडिंग काचेच्या बाऊलमध्ये टाकून सर्व्ह करा.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती