होळी विशेष रेसिपी खसखशीची चविष्ट थंडाई

शनिवार, 27 मार्च 2021 (08:41 IST)
होळीचा सण आणि त्यात थंडाई नाही असे शक्य नाही. आज  आरोग्यवर्धक पौष्टीक आणि चविष्ट खसखशीची थंडाई करण्याची रेसिपी सांगत आहोत. चला जाणून घेऊ या साहित्य आणि कृती.  
 
साहित्य- 
400 मि.ली. दूध, 15 बदाम पाण्यात भिजत घातलेले, 2 चमचे खसखस,2 चमचे शोप,8 वेलची,12 चमचे साखर,2 चमचे काळी मिरी, 2 चमचे जिरे,केसर,300 मिली  पाणी,बर्फाचे तुकडे.
 
कृती -
सर्व मसाले एकत्र वाटून घ्या. बदाम देखील वाटून या मसाल्यात मिसळा. पाणी आणि दूध एकत्र करा या मध्ये बदाम आणि मसाल्याचे मिश्रण घाला आणि गाळून बर्फाचे खडे मिसळून खसखस -वेलची ची थंडाई सह होळीचा आनंद घ्या. 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती