Covid-19 Patient ला Oxygen ची कमतरता जाणवल्यास काय करावे

मंगळवार, 4 मे 2021 (17:53 IST)
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना विषाणूच्या रुग्णांना घरात काळजी घेत असताना ‘प्रोनिंग’ करण्याचा सल्ला दिला आहे आणि म्हटले आहे की हे त्या रुग्णांसाठी फायद्याचे आहे जे घरात आयसोलेट आहे आणि ज्यांना श्वास घेताना त्रास जाणवतो. मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जर रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते प्रोनिंग पद्धत अमलात आणू शकतात. प्रोनिंग एखाद्या रुग्णाला योग्यरीत्या आणि सुरक्षित पद्धतीने पोटावर झोपवण्याची क्रिया आहे. माहितीनुसार प्रोनिंग वैद्यकीयदृष्ट्या स्वीकार्य मुद्रा आहे ज्यात ऑक्सिजन फुफ्फुसांमध्ये सहजपणे पोहोचतो आणि फुफ्फुसे चांगले कार्य करण्यास सुरूवात करतात. पोटावर झोपण्याचं महत्त्व सांगत मंत्रालयाने म्हटले की या आसानमध्ये फुफ्फुसांमधील ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीने होते ज्याने श्वास घेणे सोपं जातं. 
 
प्रोनिंगची गरज तेव्हाच भासते जेव्हा रुग्णाला श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल आणि एसपीओ2 अर्थात जेव्हा शरीरातील ऑक्सिजनची पातळी 94 च्या खाली गेली असेल. एसपीओ2 वर सतत देखरेखीसह तापमान, रक्त परिसंचरण आणि ब्लड शुगरची देखरेख देखील विलगीकरणात महत्त्वाची आहे. रक्तामध्ये ऑक्सिजनचे व्यवस्थित प्रसार होत नसेल तर लक्षणे तीव्र होऊ शकतात. वेळेवर पोटावर झोपवल्यास आणि वेंटिलेशन योग्य ठेवल्यास बर्‍याच लोकांचे प्राण वाचू शकतात. 
 
तथापि, मंत्रालयाने खाण्याच्या एक तासानंतर पोटावर सपाट पडून राहण्यास सांगितले असून शक्यतो जोपर्यंत करता येईल तोपर्यंतच करावं असा इशारा दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती