वर्ध्याच्या जेनेटिक सायन्स लॅब कंपनीत रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू

गुरूवार, 6 मे 2021 (18:03 IST)
विदर्भातील वर्धा येथे रेमडेसिवीर औषधाचे उत्पादन सुरु झाले आहे. वर्ध्याच्या जेनेटिक सायन्स लॅब कंपनीत रेमडेसिवीर औषधाचे उत्पादन होत आहे.  जेनेटिक सायन्स लॅब कंपनीत दररोज 30 हजार वायल या कंपनीत तयार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी  या कंपनीला तीन दिवसात परवानगी मिळवून दिली.  
 
कोरोना रुग्णांना उपचारासाठी अतीशय महत्वाचे समजले जाणारे इंजेक्शन म्हणजे सध्या रेमडेसिवीर याला प्राधान्य देण्यात येत आहे. कारण हे इंजेक्शन कोरोना रुग्णांसाठी राज्यात संजीवनी ठरत आहे. या रेमडीसीवर इंजेक्शनची मोठी मागणी असल्याने त्याचा काळा बाजार देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. हा काळा बाजार थांबावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्ध्याच्या जेनेटिक सायन्स लॅब या कंपनीला पाठपुरावा करीत रेमडीसीवरचं बनविण्याची परवानगी मिळवून दिली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती