राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच, १४ हजार ३६१ नवीन रुग्णांचे निदान

शनिवार, 29 ऑगस्ट 2020 (08:30 IST)
राज्यात शुक्रवारी ११ हजार ६०७ रुग्ण बरे झाले तर १४ हजार ३६१ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.६२ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ४३ हजार १७० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ८० हजार ७१८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.
 
निदान झालेले १४,३६१ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३३१ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात नोंद झालेले मृत्यू) :
 
पाठविण्यात आलेल्या ३९ लाख ३२ हजार ५२२ नमुन्यांपैकी ७ लाख ४७ हजार ९९५ नमुने पॉझिटिव्ह (१९.०२ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ०१ हजार ३४६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३४ हजार ९०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३३१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१८ टक्के एवढा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती