Fact Check : वाफेमुळे कोरोना नष्ट होतो हा दावा असत्य आहे

गुरूवार, 16 जुलै 2020 (18:21 IST)
सोशल मीडियात असा दावा केला जात आहे की गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोना नष्ट होतो. यात असे ही म्हणण्यात आले आहे की, नाकाने किंवा तोंडाने गरम पाण्याची वाफ घेतल्यास कोरोना 100 टक्के नष्ट होतो आणि यात ही माहिती सर्वांना पाठवण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
 
पडताळणी
हा दावा करण्यात आल्यानंतर या बाबत पडताळणी सुरू केली की खरंच गरम पाण्याची वाफ घेतल्यास कोरोना नष्ट होतो का? याबाबत काही कीवर्ड्सच्या आधारे शोध घेतला तेव्हा असे आढळून की कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी लोक गरम पाण्याची वाफ घेत आहेत, मात्र अधिक वाफ घेणे हे शरीरासाठी घातक असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. वाफ घेतल्याने श्वास घेण्यास समस्या येत नाही असे ही यात म्हटले आहे. पण यामुळे कोरोना 100 टक्के बरा होतो असा दावा कुठेही केलेला नाही आहे. 
 
तसेच सेंटर फॉर रेस्टॉरंट्स कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन या अमेरिकेतील संस्थेच्या वेबसाइटवर देखील हीच महीती मिळाली असून यात ही असेच सांगण्यात आले आहे की गरम पाण्याची वाफ घेतल्याने सर्दीच्या त्रासापासून सुटका होते. पण यात देखील कुठेही गरम पाण्याच्या वाफेमुळे कोरोना 100 टक्के बरा होत असल्याचा दावा करण्यात आलेला नाही.
 
याशिवाय पीआयबीने देखील गरम वाफेच्या दाव्यासंदर्भात ट्विट करून हा व्हायरल दावा सत्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. ट्विटमध्ये सांगितल्याप्रमाणे गरम पाण्याच्या वाफेमुळे कोरोना नष्ट होतो या गोष्टीला कोणताही शास्त्रीय आधार आढळला नाही.


तसेच WHOच्या वेबसाइटवर कुठेही गरम वाफ घेतल्यास कोरोना नष्ट होत असल्याचा उल्लेख नाही परंतु वेबसाइटवर कोरोना कसा रोखता येईल व त्यापासून कसा बचाव करता येईल यासाठी कोणती सावधगिरी बाळगावी याची माहिती मात्र दिली आहे.  
यावरून हेच स्पष्ट होते की, गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोना 100 टक्के नष्ट होत नाही आणि तो नष्ट होत असल्याचा हा दावा असत्य आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती