‘वन वर्ल्ड: टूगेदर एट होम’ मध्ये शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राचा सहभाग

बुधवार, 8 एप्रिल 2020 (07:48 IST)
करोनाविरोधातील लढ्याला आर्थिक बळ देण्यासाठी बॉलिवूडमधील कलाकार मदत करत असताना आता जगभरातील कलाकारही पुढे आले आहेत. हे कलाकार एका कार्यक्रमाच्या माध्यमातून निधी उभारणार असून तो जागतिक आरोग्य संघटनेला देणार आहे.
 
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ‘वन वर्ल्ड: टूगेदर एट होम’ हा इव्हेंट करत असून याचं थेट प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रीमिंग) होणार आहे. विशेष म्हणजे या इव्हेंटमध्ये हॉलिवूड कलाकारांसोबत अभिनेता शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा या बॉलिवूड कलाकारांचाही सहभाग आहे.
 
‘वन वर्ल्ड: टूगेदर एट होम’  या इव्हेंटमध्ये हॉलिवूड गायिका लेडी गागा, डेव्हिड बॅकहम, जॉन लॅजेंड, अॅल्टन जॉन, प्रियांका चोप्रा आणि शाहरुख खान या कलाकारांचा सहभाग आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्फीटन कोलबर्ट ,जिमी किम्मेल आणि जिमी फॉलन हे करणार असून या शोचं १८ एप्रिल रोजी ब्रॉडकास्ट करण्यात येईल. दरम्यान, प्रत्येक कलाकार त्यांच्या घरी राहूनच या शोमध्ये सहभागी होणार आहे. अभिनेता शाहरुख खान आणि प्रियांका या कार्यक्रमात भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती