करोनाची नवीन लक्षणे, या प्रकारे घ्या काळजी

गुरूवार, 8 एप्रिल 2021 (12:54 IST)
कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा थैमान मांडला असून लोकांची काळजी वाढत चालली आहे. ऑक्टोबरमध्ये असं वाटतं होतं की कोरोनाशी लढाई आपण जिंकून घेतली आहे पण आता पुन्हा एकदा हा विषाणू सर्वांसाठी धोकादायक ठरतं आहे. देशात नवीन स्ट्रेनचे प्रकरणं वाढत चालले आहेत. काळजीची बाब म्हणजे अनेक लोकांच्या सामान्य आजारासोबतच कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव्ह येत आहे. याचा अर्थ सदी-पडसं, खोकला, ताप, श्वास घेण्यात त्रास या व्यतिरिक्त अनेक आरोग्य संबंधी स्थिती कोव्डिचे लक्षणं असू शकतात.
 
कोणते लक्षण आहे कोरोनाचे
थकवा-कमजोरी, शरीरात वेदना, उल्टी, डायरिया सारख्या आजारासोबत लोकांच्या कोव्हिड -19 टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव्ह येत आहे. आता लोकांना श्वास घेण्यात आणि वास येत नसल्याची समस्या अधिक काळासाठी जाणवत आहे. अशात शरीरात काहीही असामान्य घडत असल्याचे जाणवत असल्यास बचाव म्हणून कोरोना टेस्ट करवावी.
 
काय काळजी घ्यावी
आपल्याला लागण झाल्याची कळून आल्यावर सामान्य रुपात आराम केल्याने फायदा होता. तरी व्हायरस शरीरात प्रवेश केल्यामुळे बरं वाटायला जरा वेळ लागू शकतो तरी दुर्लक्ष करता कामा नये. अशात तपासणी आवश्यक आहे, टेस्ट न केल्याने आपण दुसर्‍यांसाठी धोका वाढवत आहात हे लक्षात असू द्यावे.
 
बचाव कसे करावे
कोव्हिडपासून बचावासाठी सरकारने दिलेल्या निर्देशानाचे पालन करावे. जसे मास्क लावणे, सोशल डिस्टेंसिंग ठेवावे. तसेच कोरोनाचा संसर्ग असल्यास आयसोलेट राहावे, 
 
लिक्विड डायट अधिक घ्यावी प्रोटीन आणि इतर वेळोवेळी पौष्टिक आहाराचे सेवन करत राहावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती