मुंबईत नाकावाटे लसीकरणाला प्रारंभ

गुरूवार, 27 एप्रिल 2023 (21:26 IST)
मुंबईत पुन्हा एकदा डोके वर काढणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे मुंबईकरांना 24 लसीकरण केंद्रांवर आता नाकावाटे घ्‍यावयाच्‍या इन्‍कोव्‍हॅक लस देण्यात येणार आहे. या कोरोना-19 प्रतिबंधक लसीकरणाला 28 एप्रिलपासून प्रारंभ करण्यात येणार आहे. मात्र 60 वर्षे वयावरील पात्र नागरिकांना, त्यांनी कोविशिल्ड अथवा ची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्‍कोव्‍हॅक लसीची प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येणार आहे.
कोवॅक्सिन
मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या आदेशाने, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्‍त (सार्वजनिक आरोग्‍य) संजय कुऱ्हाडे हे स्वतः लक्ष घालून कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक लसीकरण व अन्य उपाययोजना संबंधित अधिकाऱ्यांमार्फत मार्गी लावत आहेत. आतापर्यंत 2 कोटी 21 लाख 96 हजार 995 नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना-19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु झाली होती. प्रारंभी प्राधान्य गटांचे व त्यानंतर 1 मे 2021 पासून 18 वर्षे वयावरील सर्व नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले होते. कोरोना-19 लसीची प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन/बूस्टर डोस) 10 जानेवारी 2022 पासून देण्यात येत आहेत. 26 एप्रिल अखेरपर्यंत 2 कोटी 21 लाख 96 हजार 995 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली, दुसरी आणि प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात आली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती