मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोना पॉझिटिव्ह

गुरूवार, 10 सप्टेंबर 2020 (13:47 IST)
महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोणतीही लक्षणं नसल्यानं त्यांनी घरीच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. महापौरांच्या घरातील सदस्यांचीदेखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
 

मी कोविड अँटीजन चाचणी करून घेतली ती सकारात्मक आली कोणतंही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरन होत आहे माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी
माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली.
आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन pic.twitter.com/ayW43cXGrj

— Kishori Pednekar (@KishoriPednekar) September 10, 2020

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती