देशात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

रविवार, 10 मे 2020 (10:15 IST)
महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा २० हजारांच्या पुढे गेला आहे. आहेत, तर मृत्यू झालेल्यांची संख्याही सर्वाधिक आहे. महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या २०,२२८ झाली आहे, तर ७७९ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.
 
 एका दिवसात कोरोनाचे १,१६५ नवे रुग्ण आढळले आहेत, तर २४ तासात कोरोनामुळे ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १२,८६४ एवढी आहे, तर आत्तापर्यंत मुंबईत ४८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
 
राज्यात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक असले तरी ३ भागांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही. लातूर महानगरपालिका, वर्धा आणि गडचिरोली या भागामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या शून्य आहे. तर चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वाशीम, बीड, परभणी मनपा, परभणी या भागामध्ये कोरोनाचा प्रत्येकी १-१ रुग्ण आहे. 
 
पाहा राज्याच्या कोणत्या भागात किती रुग्ण
राज्यातल्या कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीनुसार ग्रीन झोन, ऑरेंज झोन आणि रेड झोन घोषित करण्यात आले आहेत. राज्यात १४ रेड झोन, १६ ऑरेंज झोन आणि ६ ग्रीन झोनचा समावेश आहे.
 
रेड झोन
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव, मुंबई उपनगर 
 
ऑरेंज झोन
रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड, वर्धा

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती