ऑलिम्पिकला समर्थन दिल्याबद्दल बाक यांनी मानले मोदींचे आभार

शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (15:30 IST)
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आओसी)चे अध्यक्ष थॉमस बाक यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मदी यांचे टोकियो 2020 ऑलिम्पिकचे समर्थन केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

कोरोना व्हायरसच महामारीमुळे ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन आता 2021मध्ये होणार आहे. मोदी यांना एक एप्रिल रोजी पाठवलेल्या पत्रात बाक यांनी म्हटले आहे की, नुकतच्या झालेल्या जी20 परिषदेच्या नेत्यांच्या संमेलनात टोकियो ऑलिम्पिकचे समर्थन केल्यामुळे मी भारतीय पंतप्रधानांचा आभारी आहे.

कोरोना महामरीमुळे हे संमेलन व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे झाले होते. बाक यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, कोरोना व्हायरस रोखण्यात योगदान दिल्याबद्दल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे कौतुक करताना जी20 नेत्यांच्या संमेलनात   टोकियो ऑलिम्पिकसाठी समर्थन व्यक्त केल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती