डिसेंबरपर्यंत भारताला मिळणार करोनाची लस

मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (17:52 IST)
कोरोना व्हायरस पसरत असलेल्या या संकटाच्या काळात भारतातून एक मोठी दिलासादायक बातमी आली आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने डिसेंबरपर्यंत कोरोनाला हरवणारी लस उपलब्ध होणार असा दावा केला आहे. 
 
या वर्षाच्या अखेरिस भारतला आपली करोनाची लस मिळणार असल्याचा दावा सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी केला आहे. 
 
सीएनबीसी टीव्ही १८ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की दोन महिन्यांत कंपनी लशीच्या किंमतीबाबत माहिती देणार आहे. पूनावाला असेही म्हणाले की, अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठासमवेत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कोरोना व्हायरस लस तयार करीत आहे, ज्याचे टेस्ट रिझल्ट चांगले आले आहेत.
 
पूनावाला यांनी सांगितले की, आम्ही ICMR यांच्यासमवेत भारतातील हजारो रुग्णांवर या लसीची चाचणी करणार आहोत. त्यांना खात्री आहे की लशीची चाचणी यशस्वी होईल. 
 
सिरम ही संस्था, GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून करोना लसीसाठी १५० मिलियन डॉलर्सचा निधी दिला जाणार आहे. सिरम इन्स्टिट्युट २०२१ पर्यंत १०० दशलक्ष डोस पुरवणार आहे. या लसीची जास्तीत जास्त किंमत ३ यूएस डॉलर्स म्हणजे साधारण २२५ ते २५० रुपयांपर्यंत असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्युटने दिली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती