तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी दिलीच कशी?

शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (11:46 IST)
तबलिगी मरकजच्या कार्यक्रमाला केंद्र सरकारने परवानगी दिलीच कशी? असा प्रश्न राजचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारला आहे. अजूनही 60 लोक मोबाइल बंद करुन बसले आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. महाराष्ट्रात आणि देशात या मरकजुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असाही आरोप देशमुख यांनी केला.

पत्रकार परिषदेत त्यांनी हा गंभीर आरोप केला. दिल्लीतल्या मरकजवरुन केंद्र सरकारवर पुन्हा एकदा राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी आरोप केला आहे. 15 आणि 16 मार्चला महाराष्ट्रातल वसईतही असा कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमाबाबत जेव्हा आम्हाला माहिती मिळाली तेव्हा आम्ही हा कार्यक्रम होऊ दिला नाही. मात्र दिल्लीतल्या    निजामुद्दीनमध्ये हा कार्यक्रम झाला त्यामुळे देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला. देशातले 35 टक्के कोरोनाबाधित हे तबलिगी मरकजुळे झाले आहेत असाही आरोप देशमुख यांनी केला. तसेच केंद्र सरकारने या कार्यक्रमाला परवानगी दिलीच कशी याचे उत्तर द्यावे असेही त्यांनी म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती