तर कोरोना लसीचे उत्पादन तीन आठवड्यांत शक्य

मंगळवार, 28 एप्रिल 2020 (17:01 IST)
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय)चे सीईओ आदर्श पूनावाला यांनी असा दावा केली आहे की, कोरोना लसीकरण चाचणी यशस्वी झाल्यास कोविड -19 लसीचे उत्पादन तीन आठवड्यांत सुरू करण्यात येईल. यापूर्वी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या एका प्रसिद्धीपत्रकात या कोरोना लसीकरणासंदर्भात सांगण्यात देखील आले होते. एसआयआयची टीम ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या डॉक्टरांशी चर्चा करत यांवर काम करत आहे. संस्थेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत बाजारात ही लस उपलब्ध होईल, मात्र चाचण्यांद्वारे सर्व आवश्यक सुरक्षा मानदंड आणि त्यासंदर्भातील हमी दिली गेली तर ते शक्य होणार असे देखील सांगण्यात येत आहे.
 
ब्रिटनमध्ये एसआयआयची लस सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत तयार केली जाईल तसेच या लसीची क्लिनिकल चाचणी यशस्वी होण्याची देखील अपेक्षा आहे. भारतात या लसीकरणाची चाचणी मे महिन्यात सुरू करण्यात येईल, अशी आशा एसआयआयतर्फे व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, या लसीची चाचणी पुर्णतः यशस्वी झाल्यास सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत लस बाजारात येण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती