सावधान! आता 'या' ६ प्रकारे होऊ शकतं कोरोनाचं संक्रमण; WHOची धोक्याची सुचना

रविवार, 19 जुलै 2020 (17:37 IST)
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एका दिवसात कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्यामुळे  जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) सांगितले की, कोरोनाची माहामारी अजून रौद्र रुप धारण करू शकते. या व्हायरसच्या प्रसाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने माहिती दिली आहे. कोरोना व्हायरस कोणकोणत्या माध्यमातून पसरू शकतो याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितले की, सहा प्रकारे कोरोना व्हायरसचं संक्रमण होऊ शकतं. 
 
संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे व्यक्ती कोरोना संक्रमित होऊ शकते. (Corona virus infection in six ways)
संक्रमित व्यक्तीच्या शिंकण्यातून किंवा खोकण्यातून लाळेच्या ड्रॉपलेट्समधून व्हायरस हवेत पसरल्यास संक्रमण होऊ शकतं.
संक्रमित व्यक्तीच्या रक्तामुळे संक्रमण पसरण्याचा धोका असू शकतो. 
आईला कोरोनाची लागण झाली असल्यास बाळालाही कोरोनाचं संक्रमण होऊ शकतं.(Corona virus infection in six ways)व्हायरसच्या विळख्यात अडकलेल्या प्राण्यांच्या संपर्कात आल्यामुळे लागण होण्याची शक्यता असते. 
संक्रमित व्यक्तीने उघड्यावर मलविसर्जन केल्यास व्हायरसचा प्रसार इतर व्यक्तींपर्यंत होण्याची शक्यता असते. 
जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याची सुचना दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहेनम गेब्रयेसस यांनी मागच्या आठवड्यात कोविड 19 च्या माहामारीबाबत धोक्याची सुचना दिली होती. त्यांनी सांगितले की, जगभरात दिवसेंदिवस कोरोनाची माहामारी अधिकच धोकादायक होत चालली आहे. आता कोरोनासोबतच जगावं लागणार आहे. अनेकदेश या माहामारीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती