कोरोना व्हॅक्सीनचे शनिवारपासून परिक्षण

शुक्रवार, 24 जुलै 2020 (16:11 IST)
दिल्लीतील एम्स रुग्णालयात शनिवारपासून कोरोना व्हॅक्सीनचे परिक्षण केले जाणार आहे. ट्रायल देणाऱ्या सर्व स्वयंसेवकांच्या तपासणीचे रिपोर्ट पुढील शुक्रवारपर्यंत येतील. त्यानंतर या स्वयंसेवकांना परिक्षणासाठी रुग्णालयात बोलावले जाईल.
 
एम्स रुग्णालयातील कोविड व्हॅक्सीन प्रोजेक्टचे प्रमुख शोधकर्ता डॉ. संजय राय यांनी सांगितले की, या परिक्षणात सहभागी होण्यासाठी ज्या स्वयंसेवकांनी अर्ज केले होते, त्यांच्या टेस्टचे रिपोर्ट शुक्रवारपर्यंत येतील. रिपोर्टमध्ये जे लोक पूर्णपणे स्वस्थ असतील, त्यांचे शनिवारपासून परिक्षण केले जाईल. पहिल्या टप्प्यात १००  लोकांना सहभागी करून घेतले जाईल.
 
ते म्हणाले, या परिक्षणासाठी संबंधित व्यक्ती पूर्णपणे स्वस्थ असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांची संपूर्ण तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये कोरोना व्हायरस, एंटिबॉडी आणि अन्य सर्व तपासण्या केल्या जातील. त्यानंतर या सर्वांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरच संबंधित व्यक्ती परिक्षणासाठी योग्य आहे असे मानले जाईल. व्हॅक्सीनचा डोस दिल्यानंतर दोन ते चार तासापर्यंत कोणताही दुष्प्रभाव आढळला नाही तर त्यांना घरी सोडण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती