काय म्हणता, राष्ट्रपती भवनापर्यत कोरोना पोहोचला

मंगळवार, 21 एप्रिल 2020 (15:59 IST)
राष्ट्रपती भवन परिसरात राहणाऱ्या एकाला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. हा रुग्ण राष्ट्रपती भवनात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा नातेवाईक आहे. करोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर राष्ट्रपती भवन परिसरात राहणाऱ्या २५ कुटुंबियांना अलगीकरण करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रपती भवनात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची परिसरातच निवासस्थानं आहेत. हा रुग्ण राष्ट्रपती भवनात 
कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा नातेवाईक आहे.

राष्ट्रपती भवन परिसरात जवळपास २५ कर्मचाऱ्यांची निवासस्थानं असून, या कुटुंबातील सगळ्यांना अलगीकरण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर करोना बाधित रुग्णाला बिर्ला मंदिर संकुलाजवळ असलेल्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती