कोरोना अपडेट : राज्यात रविवारी सर्वाधिक रुग्ण घरी सोडले

सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (08:43 IST)
राज्यात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी २३ हजार ५०१ एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून रविवारी २१ हजार ९०७ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख ५७ हजार ९३३ पोहोचली आहे. राज्यभरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. सध्या २ लाख ९७ हजार ४८० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५७ लाख ८६ हजार १४७ नमुन्यांपैकी ११ लाख ८८ हजार १५ नमुने पॉझिटिव्ह ( २०.५३ टक्के) आले आहेत. राज्यात १८ लाख  ०१ हजार १८० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३९ हजार ८३१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४२५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७१ टक्के एवढा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती