तामिळनाडूमधील नोकियाच्या ४२ कर्मचाऱ्यांना कोरोना,प्लान्ट बंद

बुधवार, 27 मे 2020 (18:31 IST)
तामिळनाडूमधील श्रीपेरंबुदूर येथील मोबाईल बनवणाऱ्या प्रसिद्ध नोकिया कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लान्टमध्ये ४२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या या कंपनीचा प्लान्ट बंद ठेवण्यात आला आहे.

नोकिया कंपनीने गेल्या आठवड्यात तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूर येथील प्लान्ट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. कंपनीत काम करणारे ४२ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आज कंपनीने प्लान्ट बंद असल्याचे सांगितले. लॉकडाऊनमध्येही परवानगी मिळाल्यानंतर नोकियानेही आपल्या तामिळनाडू येथील प्लान्टमध्ये पुन्हा एकदा कामाची सुरुवात केली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती