महाराष्ट्रातील 9 शहरांमध्ये कोरोनाचा उद्रेग ,पुणे देशात नंबर 1

शुक्रवार, 19 मार्च 2021 (22:01 IST)
महाराष्ट्रात कोरोना झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाव्हायरसने राज्यातील उद्धव ठाकरे सरकारसह केंद्र आणि शेजारील राज्यसरकारची चिंता देखील वाढविली आहे. गेल्या 24 तासात राज्यात  25,833 नवीन प्रकरणे समोर आली आहे. मराठवाडा,विदर्भ समवेत संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातला आहे.सध्या भारतात सर्वाधिक प्रकरणे पुण्यातूनच येत आहेत.देशात कोरोनाचा उद्रेग सर्वात जास्त ज्या जिल्ह्यात आहे, त्यापैकी 9 महाराष्ट्रातील आहे. पुणे,नागपूर,मुंबई,औरंगाबादसह संपूर्ण राज्यात कोरोनाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.पुण्यातील इतर शहरांमध्ये तसेच शहरे आणि खेडेगावांमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. 
 
राज्यातील अनेक शहरांमध्ये कोरोनावर उपाय योजना म्हणून नाईट कर्फ्यू,लॉक डाऊन सारखी पाऊले उचलावी लागली आहे. तरीही स्थिती अनियंत्रित होत आहे. याचा धडा घेता शेजारच्या अनेक राज्यातून येणाऱ्या लोकांसाठी कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे. 
 
महाराष्ट्रातील पुण्यात सध्या स्थिती अत्यंत गंभीर दिसत आहे. गुरुवारी, कोरोनाव्हायरस संसर्गाची 4,965 नवीन प्रकरणे नोंदली गेली, त्यानंतर एकूण प्रकरणे 4,53,532 वर गेली. तसेच 31 रुग्ण मृत्युमुखी झाल्यावर मृतांची संख्या वाढून 9,486 झाली आहे.पुण्यात तसेच जवळच्या जिल्ह्यात कोरोनाची बरीच प्रकरणे सामोरी येत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती