महाराष्ट्रासह चार राज्यांमधील नागरिकांना कर्नाटकात 31 मे पर्यंत प्रवेश नाही

मंगळवार, 19 मे 2020 (12:24 IST)
महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू या चार राज्यातील नागरिकांना कर्नाटकात 31 मेपर्यंत  म्हणजेच लॉकडाउनचा चौथा टप्पा संपेपर्यंत प्रवेश मिळणार नाही असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले.
 
येडियुरप्पा यांनी असेही सांगितले की, लॉकडाउनच्या नियमांची काटेकोर अंलबजावणी केली जाणार आहे. कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सेवांची दुकाने बंद असतील. तसेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकाने सुरु असतील तर इतर भागांमध्ये काही परवानग्या देण्यात आल्या आहेत असेही तंनी सांगितले.
 
लॉकडाउन 4 मध्ये राज्यातल्या बसेस आणि खासगी बसेसना संमती देण्यात आली आहे. या बसेसमध्ये एकावेळी फक्त 30 माणसे असतील. मास्क लावणे आणि डिस्टन्सिंग पाळणे हे महत्त्वाचे असेल. एकाही बसचे तिकिट वाढवले जाणार नाही.
 
ऑटो किंवा टॅक्सी सेवाही सुरु करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. मात्र राज्याच्या सीमा ओलांडता येणार नाहीत. ऑटो किंवा टॅक्सी यामध्ये चालकास एकूण तिघांनाच बसण्यासाठी संमती देण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले. तसेच लॉकडाउन चारच्या कालावाधीत राज्यातील सर्व दुकानेखुली करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र 31 मेपर्यंत महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू या राज्यामधील लोकांना येण्यास मनाई करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती