महाराष्ट्रात पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपीच्या मागणीला मान्यता

शुक्रवार, 24 एप्रिल 2020 (21:10 IST)
महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपी आणि पूल टेस्टिंग या मागणीला केंद्राची मान्यता मिळाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सगळ्या राज्यांचे आरोग्यमंत्री उपस्थित होते. त्याच व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपी आणि पूल टेस्टिंगला केंद्राने मान्यता दिली आहे. ही माहीत टोपे यांनी ट्विटरच्या माध्यामातून दिली आहे.
 
Portable Pulse Oxymter आणि Portable X Ray Digosis ची मदत घेऊन रुग्ण निदान करणं व करोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणं तसंच पीपीचे स्टरलायझेशन करुन त्याचा पुनर्वापर करण्यासाठी सुचवलेल्या मुद्द्यांचंही विशेष कौतुक केले गेले असे टोपे यांनी म्हटलं आहे. 
 
खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये टेस्टिंग लॅब सुरु करण्याच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांनी प्रतिसाद दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती